Home विदर्भ यवतमाळ जिल्ह्याला कायम स्वरूपी सरकारी कामगार अधिकारी द्या – निरज वाघमारे

यवतमाळ जिल्ह्याला कायम स्वरूपी सरकारी कामगार अधिकारी द्या – निरज वाघमारे

82
0

 कामगार उपायुक्त यांच्याकडे निवेदनातून केली मागणी.

यवतमाळ –  जिल्ह्यातील सरकारी कामगार कार्यालयाचा कारभार गेल्या अनेक वर्षांपासून प्रभारावर असल्याने येथील कारभार पूर्णपणे ढेपळेला असून याचा सामान्य नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो, याच मागणीला घेऊन आज स्वाभिमान कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निरज वाघमारे यांनी सरकारी कामगार उपायुक्त, अमरावती यांची भेट घेऊन जिल्ह्याला कायम स्वरूपी कामगार अधिकारी नेमावा अशी मागणी एका निवेदनातून केली.
यवतमाळ जिल्हा हा विदर्भातील एक मोठा जिल्हा असून जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे . त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कामगारांच्या न्यायहक्क व अडीअडचणी समस्या सोडविण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे . मात्र जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातील सरकारी कामगार अधिकारीच हजर नसल्याने या कार्यालयावर कोणाचेही नियंत्रण व वचक राहत नाही. जिल्ह्यातील सरकारी कामगार अधिकाऱ्यांचे पदभार सद्यस्थितीत अमरावती येथील कामगार अधिकाऱ्यांवर असल्याने हे अधिकारी आपल्या फुरसतीने आठवड्यातुन एखाद्या वेळेस या कार्यालयात दाखल होत असतात.
त्यामुळे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून येणाऱ्या कामगारांची व कामगार कुटुंबियांची अनेक कामे खोळंबलेली आहेत . यवतमाळ जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने व्यापक स्वरुपाचा असून जिल्ह्यात सहा उपविभाग व सोळा तालूके असून जिल्ह्याच्या एका टोका पासून ते दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर २९५ किलोमीटरचे अंतर आहे . त्यामुळे शेवटच्या टोकापासून येणारा नागरिक हा शंभर ते दिडशे किलोमिटरचे अंतर पार करून आपल्या कार्यालयात कामानिमित्त येत असतो परंतु येथे स्थायी स्वरुपाचे कामगार अधिकारीच उपलब्ध नसल्यामुळे आलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा पडते याच बरोबर या नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या उपलब्धे संदर्भात या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आल्या नंतर सदर कर्मचारी हे टोलवाटोलवीचे उडवा उडवीचे आणि द्वेषदायक उत्तरे देतात. त्याचबरोबर या नागरिकांना तुच्छतेची वागणुक देत असतात असा आरोप यावेळी या निवेदनातून करण्यात आला.
त्यामुळे कार्यालयाला अधिकारीच उपलब्ध नसल्याकारणाने या कर्मचाऱ्यांची तक्रार करायची तरी कुठे हा ही प्रश्न या नागरिकांसमोर निर्माण होतो . जिल्ह्याला कामगार अधिकाऱ्यांचे पद व कार्यालय असतांना जिल्ह्यातील असंघटीत घरेलू कामगारांच्या नोंदणी , बांधकाम कामगारांच्या नोंदणी व अन्य कामगारांच्या नोंदणी व याच बरोबर इतर संबंधीत कामे होत नाही व यामुळे कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनेच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे . कामगारांच्या नोंदणीचे नुतणीकरणही सद्यस्थितीत होत नाही. नोंदणीसाठी येणाऱ्या कामगारांना कार्यालयात अधिकारीच उपलब्ध नसल्या कारणाने परत जावे लागत आहे . कामगार कल्याण महामंडळामार्फत कोणत्या योजने अंतर्गत कोणता लाभ मिळणार याचीही माहिती जिल्ह्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना देण्यास कार्यालयातील कोणताही कर्मचारी तयार नाही . त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील कामगार अधिकारी कार्यालयाला कायमस्वरुपी तात्काळ कायमस्वरूपी कामगार अधिकारी देण्यात यावा या मागणीला घेऊन आज स्वाभिमान कामगार संघटनेचे अध्यक्ष निरज वाघमारे यांनी कामगार उपायुक्त अ.ऊ. कुटे यांचीअमरावती उपायुक्त कार्यालयात भेट घेऊन ही मागणी केली.