Home विदर्भ आर्वीत प्रथमच डॉ. रिपल राणे यांनी केली सांधा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया…

आर्वीत प्रथमच डॉ. रिपल राणे यांनी केली सांधा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया…

139

पाच वर्षांपासून असणाऱ्या सांध्याच्या अस्संय वेदनेपासून डॉ राणेंनी केले रुग्णाला मुक्त….

– नवीन तंत्रझाना व अत्याधुनिक सुविधेमुळेच ग्रामीण भागात शक्य झाली ही यशस्वी शत्रक्रिया ……

ईकबाल शेख

वर्धा – एरव्ही सांधा प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियेकरिता रुग्णांना मुंबई, नागपूर सारखे मोठे व महागडे शहर गाठावे लागत होते. पण आर्वीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ रिपल राणे यांनी सांधा प्रत्यारोपणाची(Total Hip Replacement surgury) यशस्वी शस्त्रक्रिया करुन ग्रामीण भागात रुग्ण्सेवेची अखंडित परंपरा कायम ठेवली.

मागील पाच वर्षापासून ग्रामीण भागातील एका मध्यम वयीन तरुणाला सांध्याचा खूप त्रास होता. या त्रासामुळे रुग्णाला चार पावले चालणे सुद्धा कठीण झाले होते . हा रुग्ण स्वतःची तब्बेत दाखविण्याकरिता मुंबई, नागपूर इत्यादी मोठ्या शहरात जाऊन आलेला होता, मात्र त्याचे उचित समाधान तेथे होऊ शकले नाही व पैश्या अभावी पुढील उपचार करणे त्याला शक्य झाले नाही . त्यामुळे त्याने आर्वी येथील सुप्रसिद्ध वातरोग व अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. रिपल राणे यांना दाखविले. रुग्णांच्या संपूर्ण तपासाअंती असे लक्षात आले की या रुग्णाच्या उजव्या पायाचा खुबा पूर्णपणे निकामी झाला असून त्याला चालतांना व बसताना असह्य वेदना होत होत्या व त्यामुळेच त्याला त्याचे नियमित जीवन जगणेकठीन झाले होते . त्यामुळे या रुग्णाला सांधा प्रत्यारोपणाशिवाय कोणताही पर्याय नव्हता व तसा सल्ला त्याला इतर शहरातील डॉक्टरांनी दिला होता. म्हणून रुग्णांचा त्रास नेहमीसाठी निकालात काढण्यासाठी शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया यापूर्वी मोठमोठ्या शहरांत करणे शक्य होते. परंतु ग्रामीण भागात सांधाप्रत्यारोपन ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वीरित्या पार पाडण्यात आली व त्याकरिता तज्ञ शल्यचिकित्सकांची व सुंगणी तझ्याची चमू नागपूर येथून पाचारण करण्यात आली. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या चमूचे नेतृत्व डॉ. रिपल राणे यांनी केले व क्लिष्ट अश्या स्वरुपाची वाटणारी ही शस्त्रक्रिया ग्रामीण भागात पहिल्यांदाच यशस्वी करण्याचा बहुमान मिळविला. सम्पूर्ण विदर्भात अश्या प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी करणारा आर्वी हा एकमेव तालुका असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे . याकरिता परिसरातील नागरिकांनी डॉ रिपल राणे व राणे हॉस्पिटल मधील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
मागील कोरोना लॉकडाउन काळात जेंव्हा सर्वत्र दवाखाने बंद असताना,राणे हॉस्पिटलची सेवा मात्र एक दिवसही बंद न ठेवता आरोग्य सेवा ही निरंतर सुरुच होती व या कठीण काळात, राणे हॉस्पिटल आर्वी येथे कोरोना जिवाणूंच्या विरोधातील सर्व काळजी घेऊन व शासनाचे नियम पाळून परिसरातील गरजू रुग्णांच्या चारशे पन्नासहुन अधीक शस्त्रक्रिया यशस्वीपने पार पाडल्या गेल्या हे विशेष.
ग्रामीण स्तरावर अशा प्रकारच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया केल्यामुळे रुग्णांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होते व सोबतच आपल्या परिसरातील रुग्णांचा आर्थिक ताण सुद्धा कमी करता येते , यापुढे भविष्यात सुद्धा अश्या मोठ मोठ्या व अत्याधुनिक शस्त्रक्रिया करून परिसरातील रुग्णांना नेहमीच मदत करत राहील असें प्रतिपदान डॉ रिपल राणे यांनी या प्रसंगी केले.