August 5, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

अचानक बेपत्ता झालेल्या तरुणाचा चिन्ह भिन्न अवस्थेत ९ दिवसानंतर आढडला मृतदेह

लग्णापुर्वी बेपत्ता झालेल्या तरुनाचा तक्रार देऊनहि पोलीस प्रशासनाचि अक्षम्य दिरंगाई….

रवि साखरे / इकबाल शेख

वर्धा , दि. १६ :- जिल्ह्यातील आष्टि तालुक्यातील साहुर येथील तरुण विष्णु भगवंत लाड वय (२८) याचा ८ जानेवारीला विवाह समारंभ असतांना तो ६ जानेवारीला सकाळी नेहमी प्रमाणे अरविंद योग साधना, शक्ती पीठ , अरविंद आश्रम, हातुर्णी , येथे योग साधनेसाठी जात असल्याचे कारण सांगून घरुन गेला होता.

दिवस भर घरि परत न अाल्यामुळे कुटबियांनी स्वतहच्या शेतात जाऊन पाहले असता त्याची मोटारसायकल शेताच्या गेट समोर उभी होती परंतु विष्णुचा शोध घेतला असता तो कुठेहि आढडुन आला नाहि. रात्रभर त्याचा शोध घेतला आसता त्याचा कुठेच थांगपता लागला नाहि. या बाबतची तक्रार दि. ६ ज‍नेवारीला आष्टि पोलिस स्टेशन येथे करन्यात आली होती तेव्हापासुन गावातील तरुनानंनी सतत आजु बाजुच्या शेतातिल विहिरी गावालागत लागुन असलेल्या ईतर गावातहि विष्णुचा शोध घेतला परंतु त्याचा कुठेहि थांगपत्ता लागला नाहि.

पोलिसात कुंटुबियांनी तक्रार दिल्या पासुन पोलिसांनी कुठेहि शोध घेन्याचा प्रयत्न न केल्याचे मृतकाच्या नातेवाईकांचा असा आरोप अाहे. आज दि. १५ ज‍नेवारी रोजि शेतातील कापुस वेचनी करिता मृतकाचे वडिल हे महिला मजुर घेऊन आले असता त्याना छिन्न भिन्न अवस्थेत शेतात मृतदेह आढडुन आला या बाबतची माहिती आष्टि पोलिस स्टेशनला दिल्या नंतर पोलिस घटनास्थळी दाखल होउन मृतकाचे खिशे तपासले असता खिश्यात पर्स आढडुन आले त्यामध्ये त्याचे आधार कार्ड व ३ ए टि एम कार्ड सापडले त्यावरुन सदर मृतदेह हा विष्णुचाच असल्याचे निशपन्न झाले. परंतु मृतदेह हा छिन्न विछिन्न अवस्थेत असुन त्याची मोठ्या प्रमानात दुरगंदि सुद्धायेत आहे सदर मृतकाला ज्वलनशिल रसायनिक द्रव टाकुन जाडन्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन येते त्यामुळे मृतदेहाचि तपासनी करन्याकरिता फाँरेनसिक टिमला घतनास्थळावरच पाचारन करन्यात आले. अधिकचा तपास आष्टि पोलिस करित आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!