Home विदर्भ सरपंच घनश्याम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुलांचे झाड लावण्याचा संदेश.!

सरपंच घनश्याम कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फुलांचे झाड लावण्याचा संदेश.!

138

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. १६ :- जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील दिघी बोपापूर येथील सरपंच घनश्याम कांबळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी गावामध्ये आपल्या घरासमोर शोभेची वृक्ष व फुलांची सुवासिक किंवा छोटं झाड लावन्याचा संदेश दिला.

आपल्या पुर्वजांनी गाव वस्तीत छोटे रोपटे लावले.त्यांचे अवाढव्यात वृक्षामध्ये रूपातंर झाले.मोठी वृक्ष आॅक्सिजन,सावली इत्यादी फायदेशीर असले तरी नागरिकांना समस्या देखील आढळून आलेल्या दिसून येत आहेत. मधमाश्यांचे पोळ,वानरांचा त्रास, तसेच झाडांची मुळयानी आपले सिमेंट घरांना तडा जातात. आणि वादळी वार्यांनी फांदी पडेल या भितीने भयभयीत असतो.अश्याप्रकारचे अपघात दिघी गावात टळले आहेत. मोठे झाडे कापण्यासाठी सतत मागणी येतात.
गावाच्या बाहेर कितीही मोठी झाडे लावावी.पंरतु अश्या अडचणी पुन्हा येवू नये. यासाठी साधारण वाढणारी व शोभेची झाडे,सुगंधी फुलांची झाड लावण्याचा संदेश लोकांना दिला आहे.