Home विदर्भ ११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा , “५७ ग्रामपंचायत सदस्य विजयी”

११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा , “५७ ग्रामपंचायत सदस्य विजयी”

216

यवतमाळ जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे आणि तालुक्यातील अत्यंत कडवट कार्यकर्ते आणि तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात घवघवीत यश मिळवीत ११ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकवला आहे.

मनसेने जिल्ह्यात पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूकित मैदानात उतरून जिल्ह्यातील यवतमाळ, आर्णी, राळेगाव, पांढरकवडा, पुसद, दिग्रस यासह इतर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादन करत ग्रामपंचायत मध्ये प्रवेश केला आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मनसेने आपल्या विरोधकांना धोबीपछाड देत अत्यंत नवख्या समजल्या जाणाऱ्या पक्षाने मिळवलेले यश हे सर्व सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे आहे आणि यापुढे ही मनसेची घोडदौड अशीच सुरू राहील असे मत मनसेचे अनिल हमदापुरे यांनी या विजया प्रसंगी व्यक्त केले.उद्या मनसेने निवडून आलेल्या सर्व उमेदवारांच्या सत्काराचे आयोजन जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे केले आहे.मनसेच्या या विजयाबद्दल मनसेचे नेते मा.श्री बाळासाहेब नांदगावकर , राज्य सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी, राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, आनंदभाऊ येम्बडवार यांनी फोन करून जिल्हा मनसेच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत कौतुक केले आहे.या विजयासाठी मनसेचे संजय देठे, सचिन एलगंधेवार, शंकर वरघट, उमेश राठोड, विकास पवार, नंदू नेहारे, मयूर जुमळे, संदीप लांडे, निलेश राठोड, संदीप गाडगे, अभिजित नानवटकर, आकाश देशमुख ,तृषाल गबराणी,सादिक शेख, संदीप हिवाळे यासह इतर सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleमिलींद कवाडे यांच्या ग्राम विकास पँनलचे 7 उमेदवार विजयी
Next article
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.