Home मराठवाडा कष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे...

कष्टाचा,हक्काचा पैसा मिळावा यासाठी मैत्रेय गुंतवणूकदारांचा आक्रोश – सुप्रिया सुळे, आदीत्य ठाकरे यांना निवेदन

203
0

लक्ष्मण बिलोरे

जालना / मराठवाडा – शनिवारी 16 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना.. मैत्रेय ग्रुप आॅफ कंपनीज् मध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत मिळावेत यासाठी मैत्रेय पिडितांच्या वतीने शहानवाज खान आणि त्यांचे सहकारी.. तसेच औरंगाबाद मैत्रेय टिमच्या वतीने सौ. कल्पना महाजन, आणि महिला प्रतिनिधी..तसेच (बजाजनगर) मैत्रेय टिमच्या वतीने रामराव मोरे.. अरूण पाटील…इत्यादी प्रतिनिधींनी. मैत्रेय प्रलंबित परतावे लवकरात लवकर मिळावेत यासाठी आपल्या पातळीवर ठोस प्रयत्न करण्याची विनंती सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच संबंधित प्रकरणी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घालून देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली.

गेल्या पाच वर्षांपासून मैत्रेय कंपनीच्या एजंटांना होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची कल्पना तोंडी व लेखी स्वरूपात सुप्रिया सुळे यांना कथन करण्यात आली..तसेच लेखी निवेदनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात लेखी शेरा मारून निवेदन स्वीकारले.. याप्रकरणी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालण्याचे आश्वासन उपस्थित प्रतिनिधींना त्यांच्या तर्फे देण्यात आले…
खासदार सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात असोसिएशनचे डिबी पाटील, निलेश वाणी, महेंद्र दर्डा, भैय्यासाहेब माळी, गणेश देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Unlimited Reseller Hosting