Home विदर्भ तळेगाव (शा.पं.) च्या मतदार यादिमध्ये प्रचंड घोळ, राजकिय दबावापोटि मतदार यादित फेरफार.

तळेगाव (शा.पं.) च्या मतदार यादिमध्ये प्रचंड घोळ, राजकिय दबावापोटि मतदार यादित फेरफार.

262
0

वर्धा / तळेगाव (शामजीपंत ) :- तळेगाव येथील मतदार यादित प्रचंड घोळ झाल्याचे निर्शनास येत असल्याने या घोळास जबाबदार असनार्‍या संबंधित व्यक्तिवर कठोर कारवाहि व्हावी अशी मागनी जनतेतुन होत आहे.

तळेगाव हि आष्टि तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असुन येथे एकुन ८१४६ मतदार आहे आणि गावाची लोकसंख्या २० हजाराच्या वर आहे. आज होउ घातलेल्या ग्रा. पंचायतच्या निवडनुकी साठि मतदार तादि प्रसिद्ध झाली आहे.
राजकिय दबावापोटि मतदार यादित मोठ्या प्रमाणात घोळ झाला असुन अनेक नागरिक राहतात वेगळ्या प्रभागात तर त्याचे मतदान वेगळ्याच प्रभागात बदलण्यात आले आहे फक्त येवढेच नव्हे तर कुंटुबात सर्वजन सोबत राहत असलेल्या कुटंबालाच विभक्त करण्याचे काम मतदार यादि द्वारे करण्यात आले आहे काय? असा सवाल सुध्दा उपस्थित होत आहे.
नवर्‍याचे नाव एका वार्डात तर बायको नाव दुसर्‍या वार्डात, आईचे नाव कुणिकडे तर वडिलाचे नाव कुणिकडे असे गंभिर प्रकार या मतदार याद्यांमध्ये पहावयास मिळत आहे.
एका प्रभागातील गठ्ठा मतदान मिळावे म्हणुन कि काय जवळपास पन्नास ते साठ मतदार वेगवेगळ्या प्रभागातुन एका प्रभागात आेढल्या गेले असल्याचे दिसत आहे. मागील मतदार यादिचा आकडा कायम दिसावा म्हणुन की काय मृतक लोकांचेहि नाव मतदार यादिमध्ये कायम ठेवले असल्याचे जानवते
विषेश म्हणजे मागील एक ते दिड वर्षभरापुर्विच विधासभेच्या निवडनुका पार पडल्या त्यावेळी जवळपास सर्वांचेच आपन राहतो त्याच प्रभागात मतदार यादि मध्ये नाव होते व मतदान सुद्धा केले होते मग स्वत: मतदारानी प्रभाग बदलन्याबद्दल विनंत्या न करता आणि आधिच नावे अचुक ठिक‍नी असतांना सुद्धा ईतक्या मोठ्या प्रमाणात घोळ कसा केला गेला? कोण्याच्या सांगण्यावरुन केला गेला? कि कोन्या राजकिय दबावा खालि केला गेला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे? तर मागील विधानसभेच्या निवडनुकीच्या वेळेस ज्या लोकांचे नाव मतदार यादीत होते त्यापैकी बर्‍याच लोकांचे नाव ग्रामपंचायतच्या निवडनूकीमध्ये नसल्याची अोरड मतदारांकडुन होत आहे. याबाबत संबधित अधिकार्‍यां कडुन याची चाैकशी करुन कारवाई करण्यात यावी असी मागनी मतदार करित आहे.