Home विदर्भ देवळी पंचायत समितीमध्ये उत्सव साविञीचा,जागर स्ञि शक्तीचा व मुदतठेवी प्रमाणपञ वितरण. !

देवळी पंचायत समितीमध्ये उत्सव साविञीचा,जागर स्ञि शक्तीचा व मुदतठेवी प्रमाणपञ वितरण. !

156
0

योगेश कांबळे

वर्धा – एकात्मीक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती देवळी अंतर्गत तिन जानेवारी पासून क्रान्ती ज्योती साविञीबाई फुले यांच्या जंयती अंगणवाडी स्तरावर घेण्यात आलेल्या कार्यकमाचा समारोप देवळी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा वैशाली येरावार उपस्थित होत्या. कार्य क्रमात बोलतांना येरावार म्हणाल्या की, जीजाऊ मातेने शिवाजी महाराजांवर बालपणी संस्कार करुन रयतेचा राजा कसा असावा याची शिकवण दिली. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची गरज ओळखून महिलानी शिक्षणा करीता समाजात परिवर्तन घडवले त्याच प्रमाणे महिलांनी त्यांच्या आदर्श आपल्या डोळ्यां सामोर ठेवून आपल्या बाळास प्रतेक महिलाने घडविण्याचे काम करण्याचे आवाहन उपस्थित महिलांना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कुसूम चौधरी उपस्थित होत्या.
राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमीत्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाग्यश्री योजने अंतर्गत एकात्मीक बाल विकास सेवा योजनातिल लाभार्थायाना मुदत ठेवीचे (F.D.) चे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.दोन मुलीवर कुटूंब लक्रिया करणार्या गावांची सख्या बावीस असून एकुण 26 महिलाना याचा लाभ मिळाला.
कार्यक्रमाला गट विकस अधिकारी पंकज भोयर . पंचायत समितीच्या सदस्या दुर्गा मडावी. प्रकल्प अधिकारी रेखा गोरे विस्तार अधिकारी मरस्कोले, प्रफुल मेश्राम ,सुशांत वाघमारे,पराग मुरडीव यांची उपस्थिती होती.