Home महत्वाची बातमी क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न

क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाइन स्पर्धाचे बक्षीस वितरण संपन्न

85
0

यवतमाळ  / घाटँजी (तालुका प्रतिनिधी) – माळी समाज बहु उद्देशिय संस्था र न 19673 चे वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई ज्योतिबा फुले जयंती निमित्त ऑनलाईन वेशभूषा रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.कोविड 19 चे सर्व नियमाचे पालन करून संस्थेचे सचिव राजू उपरीकर यांचे घरी रविवार दि 10-01-2021 ला बक्षीस वितरण चा कार्यक्रम करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. चंद्रकांत वानखडे होते. बंगळे सर ,भास्कर मोहूर्ले , परमानंद पेटकुले , विष्णू सोनूले, दिनेश मोहूर्ले , पांडुरंग किरणापुरे, शंकर लेनगुरे, अनिल वाढोनकर , श्री राजू उपरीकर, दिनेश गाऊत्रे, मंगेश गाऊत्रे , पांडुरंग निकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांतिज्योती सावित्रीमाई च्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती मंडळी च्या हस्ते झाले.ऑनलाईन वेशभूषा स्पर्धामध्ये कु स्वरा सुनील किरणापूरे चा प्रथम क्रमांक,कु अवनी ज्ञानेश्वर वाढई व्दितीय क्रमांक, कु जान्हवी धनेश्वर वाढई तृतीय क्रमांक आला तिन्ही विजयी स्पर्धकांना शिल्ड व सावित्रीमाई चे जीवनावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले. रांगोळी स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक कु नीलिमा गुरुनू ले, द्वितीय क्रमांक सौ जयश्री सुनील किरणापूरे, तृतीय क्रमांक कु नेहा पांडुरंग निकोडे तिन्ही स्पर्धकांना शिल्ड व सावित्रीमाई चे जीवनावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले.प्रोत्साहन पर बक्षीस सौ दीपाली अमन पाटणकर याना शिल्ड व पुस्तक देण्यात आले. मंगेश गाऊत्रे यांची जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाढोनकर यांनी व आभार प्रदर्शन सांस्थेचे सचिव राजू उपरीकर यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव , सर्व सदस्य व समाज बांधवांनी सहकार्य केले.