Home मराठवाडा यमाई दिनदर्शिकेचे योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या हस्ते प्रकाशन

यमाई दिनदर्शिकेचे योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या हस्ते प्रकाशन

491

घनसावंगी प्रतिनिधी

जालना –  राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल चव्हाण यांनी गेल्या दहा वर्षापासुन यमाई दिनदर्शिका काढुन सातत्य ठेवले असुन यमाई दिनदर्शिका कॅलेंडरचे प्रकाशन नुकतेच घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे डाॅ. योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे .
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष, पञकार गोपाल चव्हाण यांनी जातेगाव येथील जागृत देवस्थान आई यमाई माता नावाने यमाई दिनदर्शिका दहा वर्षापासुन काढत सातत्य ठेवले आहे यमाई दिनदर्शिका कॅलेंडरचे प्रकाशन सोहळा जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोलीतील संजीवनी समाधी ध्यान योग ज्ञान पिठाचे अध्यक्ष डाॅ.योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या जय भद्रा निवासस्थानी रविवारी,१० जानेवारी रोजी प्रकाशन झाले यावेळी यमाई दिनदर्शिकेचे संपादक गोपाल चव्हाण , ह भ प दिलीप महाराज झेंडे,पञकार देवराज कोळे,पञकार सुनिल मिसाळ,प्रतिक तौर ,महेश मिसाळ,बप्पा खांडे सह मान्यवर उपस्थित होते.