Home विदर्भ आगरगांव येथे घराला आग जिवनावश्यक वस्तु जळुन खाक.!

आगरगांव येथे घराला आग जिवनावश्यक वस्तु जळुन खाक.!

21
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वेळीच लक्षात आल्याने अनर्थ टळला.!

वर्धा , दि. १५ :- जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील आगरगांव येथील घराला आग लागून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवार ला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागली त्यावेळी घरात कोणीही नव्हते त्यामुळे मोठी हानी टळली. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.


अशोक हुस्नापुर यांचे घर आहे. मंगळवार ला सांयकाळी अशोक हुस्नापुरे कुटुंबियांसह पुलगांव येथे त्यांच्या मुली कडे गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते.
बुधवार ला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराजवळील नागरीकांना घरातून धुर येताना दिसला ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घराला आग लागल्याचे समजताच ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. व अग्नीशामक दला ला कळविण्यात आले. घराशेजारील विहिरितील पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र आग आटोक्यात आणण्यास वेळ लागल्याने अधिक हानी झाली. या आगीबाबत अशोक हुस्नापुरे व त्यांच्या जावाई यांना कल्पना देण्यात आली. त्यांना घटनेबाबत माहिती समजताच धक्काच बसला.ते घराजवळ तत्काळ दाखल झाले.
या आगीत अशोक हुस्नापुरे यांच्या चिरेबंदी घराचे लाकडी छप्पर, दरवाजे, खिडक्या , फर्निचर आदी लाकडी सामान तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेबाबत माहिती समजताच सरपंच यांचे पती प्रविणभाऊ राऊत, मंडळ अधिकारी बागडे साहेब, तलाठी मरसकोल्हे, ग्रामसेवीका के.एन. राऊत यांनी घटनास्थळी दाखल होत पहाणी करून पंचनामा करण्यात आला.