Home जळगाव २२ व्या दिवशी तिळगुळ वाटप करून आकाशात पतंग उडवून साखळी उपोषण द्वारे...

२२ व्या दिवशी तिळगुळ वाटप करून आकाशात पतंग उडवून साखळी उपोषण द्वारे केले गोड निषेध

38
0

शरीफ शेख

रावेर , दि. १५ :– जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून साखळी उपोषणाचा बाविसावा दिवस जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर रजा ए गोसे आजम फाउंडेशन फातिमानगर यांच्या सक्रिय सहभागाने विरोध प्रदर्शन करण्यात आले.

मकर संक्रांतीचा सण द्वारे गोड़ विरोध

मकर संक्रांतीचा सण असल्याने आज मुस्लिम मंच व आजम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यावरील येणारे-जाणारे बांधवांना तिळगुळ वाटप करण्यात आले त्याच प्रमाणे उपोषण ठिकाणी पतंग उडवण्यात आल्या त्या पतंगी वर नो CAA, NRC, NPR अशा घोषणा लिहिलेल्या होत्या फारुक शेख यांनी पतंग अडवली तर करीम सालार यांनी त्या पतंगीला ढील दिला तर माज्याची साथ फारुख अहलेकार यांनी दिली.

उपोषणाची सुरुवात इमरान फ़ारसी यांच्या पवित्र कुराण पठाणाने झाली तर सांगता मुफ़्ती रमिज यांच्या दुवाने करण्यात आली.
सय्यद रेहान यांनी संपूर्ण उपोषणात सुंदर असे नारे व कविता सादर करून उपोषण आर्थी मध्ये वेगळी रंगत निर्माण केली.

यांची झाली भाषणे – डॉक्टर मोसिन कुरेशी ,शहिद पटेल, मौलाना नकिब रजा, अब्दुल करीम सालार, डॉक्ट वकार, आयाज अली ,एम आर वसीम ,इमरान खान व फारूक शेख यांनी मार्गदर्शन केले.
यावल व रावेर समितीचा पाठिंबा – यावल संविधान बचाव समितीचे अब्दुल सईद व हाकिम याकूब शेख तसेच रावेर संविधान बचाव समितीचे शेख कालू शेख नुरा व युसूफ खान इब्राहीमखान यांनी प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेऊन नोंदवून मुस्लिम मंचला पाठिंबा दिला.

निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन- डॉक्टर मोसिन कुरेशी यांच्या नेतृत्वात आसिफ खान, शादाब पटेल, सलीम खान ,शेख इस्माईल, जमीर शेख,जियाउर रहमान, इरफान पिंजारी, मुजम्मिल शेख यांनी दिले निवेदन.

यांची होती उपस्थिती – ताबिश रजा जलील अहमद इस्माईल साजिद खान पिंजारी शेख असिफ खान डॉक्टर वकार सय्यद नूर मोहम्मद युनुस मोहम्मद राखीव सय्यद जहूर आरिफ खान शेख रशीद सलीम खान मोहम्मद सलमान इरफान शेख जावेद शेख शरीफ रफी उद्दिन अकबर देशपांडे इमरान खान आदी सय्यद आज आदी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting