Home विदर्भ देवळी पोलीसांनी अवैध दारुची वाहतूक करणार्या वाहणासह चार लाख 39 हजारांचा दारुसाठा...

देवळी पोलीसांनी अवैध दारुची वाहतूक करणार्या वाहणासह चार लाख 39 हजारांचा दारुसाठा केला जप्त.!

193

योगेश कांबळे

वर्धा – देवळी पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितिन लेव्हरकर , यांनी दारूविक्रेत्यावर व अवैध रित्या दारू वाहतूक करणारे यांचेवर सतत कारवाई सुरु ठेवुन नविन वर्षात पहील्याच आठवडयात अवैध दारू वाहतूक करणार्या चारचाकी वाहनातून 29 

दारूच्या पेट्या वाहून नेत असतांना कार्यवाही केली आहे.

या दारुची किमंत 1 लाख 39 हजार 200 रूपये असून अवैध दारू वाहतूकी करिता वापरलेले हौंडा सिटी वाहन क्र. एमएच -02 एन – 8831 किमंत 3 लाख रुपये असे एकून 4,लाख 39 हजार 200 रुपये चा मुदेमाल जप्त करुन करवाई केली आहे. मागिल वर्षाच्या कार्यकाळात ठाणेदार नितिन लेव्हरकर व त्याच्ये अधिनिस्त असलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यानी सयूक्तीकरीत्या आक्टोबर मध्ये 141 केसेस, नोव्हेंबर मध्ये 104 केसेस तर डिसेंबर मध्ये 107 केसेस अवैध दारु विक्री व वाहतूक करणार्यावर मागिल 3 महिन्यात एकूण 352 अवैध दारूविक्री करण्यार्यावर करवाई करण्यात आली.
दारुविक्रीवर वचक बसवण्याकरीता प्रभावी कारवाई देवळी पोलिसनी सतत सुरु ठेवुन , 7 जानेवारी .2020 रोजी कंळब येथून यवतमाळ- नागपूर मार्गे देवळी- वर्धा येथे अवैध रित्या दारची वाहतूक होत असल्याची महीती मिळताच , गुप्त बातमीदार लावून, देवळी पोलीसांनी नाकेबंदी करुण सापळा रचून, समोरुन येणारे काळा रंगाची होंडा सिटी वाहन क्र.एमएच – 02 एन-8831चा पाठलाग केला , सदरचे वाहन देवळी येथे वेगाने समोर निघाल्याने देवळी बसस्टॉप येथे सापळा रचण्यात आला व होंडा सिटी वाहन क्र. एमएच-02 एन-8831 हे थाबवुन , चालक यास विचारपुस केली , त्याने त्याचे नाव सिध्दार्थ उत्तमराव जेठीथोर असे सागींतले या वाहनाची तपासनी केली असता, त्यात एकूण 29 देशी दारूच्या पेट्यामध्ये 180 एमएलच्या 1392 बॉटल्स कि. 4,39,200/- रु चा मददेमाल ताब्यात घेवुन , कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक , प्रशांत होळकर उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती जाधव यांचे मार्गदर्शनानुसार ठाणेदार नितिन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुरेश मडावी, दयाल , ढोक , सलीम, योगेश,आकाश ,मंगेश यांनी मिळुन कारवाई केलेली आहे.