Home नांदेड बँकेवर ऑनलाईन दरोडा 14 कोटी रुपये लंपास

बँकेवर ऑनलाईन दरोडा 14 कोटी रुपये लंपास

266
0

अमीन शाह

– आयडीबीआय (IDBI) च्या नांदेड शहरातील वाजीरबाद येथील बँकेत सायबर चोरट्यांनी तब्बल 14 कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले आहे. सायबर चोरट्यांनी आयडीबीय बँकेतील शंकर नागरी बँकेचे खाते हॅक करून बँकेच्या खात्यावरील 14 कोटी रुपयांवर RTGS द्वारे डल्ला मारला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घनटनेनंतर बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नांदेड शहरातील IDBI बँकेच्या खात्यातून अनेक नावाने खाते उघडून खात्यातील 5 लाखाच्या आतील रक्कम काढली. महत्वाचे म्हणजे काढलेली सर्व रक्कम ही आरटीजीएस (RTGS) आणि एनईएफटी (NEFT) द्वारे काढण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शंकर नागरी बँकेने लेखी तक्रार केली आहे.
यासंदर्भात शंकर नागरी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॅकरने बँकेच्या खात्यातील 14 कोटी रुपये NEFT व RTGS ने आपल्या खात्यावर वळवले. मात्र, ज्या बँकेत एवढा मोठा ऑनलाइन दरोडा पडलेला आहे त्या विषयी आयडीबीआयचे अधिकारी काहीच बोलण्यास तयार नाहीत. यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात शंकर नागरी बँकेकडुन लेखी तक्रार देण्यात आली आहे. परंतु अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.