Home बुलडाणा बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा तीन बंदुका जप्त एका आरोपीस अटक ,

बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा तीन बंदुका जप्त एका आरोपीस अटक ,

53
0

 

गुन्हा शाखेची कामगिरी

169000 चा मुद्देमाल जप्त ,

 

अमीन शाह ,

बुलडाणा

आज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन देशी कट्टे व 12 कार्टूस जप्त केले असून या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार गुन्हा शाखेचे प्रमुख बळीराम गीते यांना गुप्त माहिती मिळाली होती त्या आधारे आज छापा टाकून आरोपी राहुल सिंग पटवा रा पाचोरी , जिल्हा बऱ्हाणपूर यास पकडले असता त्याच्या ताब्यातून तीन देशी कट्टे व 12 कार्टुस जप्त करण्यात आले त्याने हा शस्त्र साठा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगला होता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 3 कट्टे किंमत दीड लाख 12 कार्तृस किंमत 6 हजार मोबाईल दहा हजार असा ऐकून 169000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यात या पूर्वी सुध्दा अनेक शस्त्र साठा जप्त करण्यात आला आहे ही कार्यवाही
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अरविंद चावरिया , मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री हेमराजसिंह राजपूत, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री बजरंग बनसोडे सर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते व
निलेश शेळके, पो उप नि
श्रीकांत जिंदमवार, पो उप नि
गजानन आहेर संजय नागवे युवराज शिंदे सतीश जाधव संजय मिसाळ यांनी केली असून या प्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ३/२५ शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे