Home विदर्भ अन , त्याने पोलीस स्टेशन समोरच घेतला गळफास

अन , त्याने पोलीस स्टेशन समोरच घेतला गळफास

167

 

पोलिसांना त्याला वाचवण्यात आले अपयश ,

अमीन शाह ,

 

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही पोलीस स्टेशन
परिसरामध्ये  एका 55 वर्षीय इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  त्याला वाचण्यात पोलिसांना अपयश आले आहे
काल रात्री सुमारे एक वाजताच्या दरम्यान अशोक महादेव राऊत, दसरा चौक सिंदेवाही येथील रहिवासी आपल्या मामाच्या विरोधात तक्रार देण्या करिता पोलीस स्टेशन ला आला होता. येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली. तो तिथून परत निघून गेला, त्यानंतर आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अशोक राऊत परत पोलीस स्टेशन मध्ये येऊन तिथे सोशल डिस्टेंस साठी लावलेल्या रस्सी ने गळफास लावले. हे बघताच तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी त्याला खाली उतरून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात सिंदेवाही येथे उपचारासाठी नेण्यात आले पुढील उपचाराकरिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे नेण्याची तयारी असताना त्याची  प्राणज्योत मावळली. या घटनेची माहिती होतात पोलीस निरीक्षक योगेश घारे घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाला करिता जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे  पाठवण्यात आले आहे. मृतक अशोक राऊत याला दारूचे व्यसन जडले होते. त्याच्या या व्यसनामुळे कुटुंबातील लोक त्रासले होते. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज शिंदे यांनी घटनास्थळावर भेट घेऊन पाहणी केली. पुढील तपास चालू आहे.