Home विदर्भ हिवरा(संगम)पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान फाळके,उपाध्यक्षपदी अनिल बोंपिलवार,सचिव पदी प्रकाश ठाकरे यांची निवड

हिवरा(संगम)पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान फाळके,उपाध्यक्षपदी अनिल बोंपिलवार,सचिव पदी प्रकाश ठाकरे यांची निवड

154

यवतमाळ / महागाव –  महागाव तालुक्यातील हिवरा(संगम) येथील पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान फाळके(दै देशोन्नती),उपाध्यक्षपदी अनिल बोंपिलवार(सा.पॉलिटिक्स स्पेशल),सचिवपदी प्रकाश ठाकरे(दै.विदर्भ कल्याण)यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पत्रकार दिनाचे औचित्य साधुन नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.यावेळी विनोद खोंडे(दै.दिव्य मराठी),राजेंद्र गिरी(दै सकाळ),सुनिल चव्हाण(दै नवराष्ट्र),गजानन कदम(दै.पुण्यनगरी),राम जाधव(दै.यवतमाळ डंका),विशाल कदम(सा. नवप्रहार),बिहारी जयस्वाल(दै तरुण भारत),विजय बोंपिलवार(दै.लोकमत),महेश कामारकर(दै. सायरन)यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.
पत्रकारांवरील होणारे अन्याय दुर करण्यासाठी , त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देण्यास सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी दिली.