Home विदर्भ आर्णी तालुक्यातील जवळा येथे 5 जानेवारी रोजी सरकार जिनींग व प्रेसिंग इंडस्ट्रीज...

आर्णी तालुक्यातील जवळा येथे 5 जानेवारी रोजी सरकार जिनींग व प्रेसिंग इंडस्ट्रीज चे उदघाटन

61
0

उदघाटक म्हणून माजी आमदार ख्वाजा बेग उपस्थित राहणार…!

अयनुद्दीन सोलंकी

घाटंजी / यवतमाळ – आर्णी तालुक्यातील जवळा येथे मंगळवारी सकाळी १० वाजता सरकार जिनींग व प्रेसिंग इंडस्ट्रीज चे उदघाटन माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांचे हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री अँड. शिवाजीराव मोघे हे राहणार आहे. विशेष अतिथी म्हणून आर्णी-केळापूर भाजपाचे आमदार डाँ. संदीप धुर्वे, माजी आमदार प्रा. राजुभाउ तोडसाम, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक मनिष पाटील, संचालक राजुदास जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रविण देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती श्रीधर मोहोड, महाराष्ट्र स्टेट मार्केटिंग फेडरेशन (मुंबई) चे संचालक सुरेश चिंचोळकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर या सह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमाचे स्थळ एन. टी. जाधव फाँर्म हाऊस च्या बाजुला असुन आर्णी – यवतमाळ फोर वे रोडवर आहे. सदरच्या उदघाटन कार्यक्रमाला जास्तीत जास्त शेतकरी व इतरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमिन मलनस, आलम मलनस, अजहर मलनस, शाहरुख मलनस, फारुख मलनस (बडगांव गाढवे) आदींनी केले आहे.