Home मराठवाडा अन त्याने धावत्या बस मध्येच केले विष प्राशन

अन त्याने धावत्या बस मध्येच केले विष प्राशन

231

अन त्याने धावत्या बस मध्येच केले विष प्राशन ,

खळबळजनक घटना ,

प्रवाश्याचा मृत्यू ,

अमीन शाह ,

गेवराई येथून एसटी बस मधून प्रवास करीत असताना एका अनोळखी इसमाने बसमध्येच विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.  उपचारादरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात या प्रवाश्याची प्राणज्योत मालवली असून त्याची ओळख मात्र अद्याप पटू शकलेली नाही.
अंदाजे 50 वर्ष वयाचा एक अनोळखी इसम गेवराईहून अंबड जाण्यासाठी एसटी बसमध्ये बसला. बस अंबड जवळ पोहचत असताना बसमध्ये दुर्गंधी येत असल्याची व एक प्रवाशी गंभीर असल्याचे प्रवाश्यांनी चालक आणि वाहकांच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा त्या प्रवाशाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचं समजताच बसमध्ये एकच खळबळ उडाली.
चालक आणि वाहकाने प्रवाश्यांच्या मदतीने सदर इसमास अंबड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जालना येथे त्या प्रवाश्याला दाखल केले असता त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सदर इसमाची ओळख अद्याप पटू शकली नसून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.