Home नांदेड आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले पत्रकार कांबळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

आ. अमरनाथ राजूरकर यांनी केले पत्रकार कांबळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

79
0

मुदखेड येथील युवा पत्रकार तथा पत्रकार संरक्षण समितीचे तालुकाध्यक्ष सचिनकुमार कांबळे यांचे 27 डिसेंबर रोजी ह्रदय विकाराच्या धक्काने निधन झाले होते.पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ गायकवाड यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे कांबळे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन लोकप्रिय आ. राजूरकर यांनी कांबळे कुटुंबियांची भेट घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मुदखेड न. प.अध्यक्ष मुजीब जहागीरदार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर ,मनपा नगरसेवक संदीप सोनकांबळे,गटनेता माधव कदम, शशीकांत गाढे पाटील,प्रशांत बारादे, नगरसेवक प्र.रावसाहेब चौदंते,जयप्रकाश चौदंते, विशालदिप चौदंते ,पत्रकार संजय कोलते,दिनेश शर्मा,ईश्वर पिन्नलवार, यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.