Home जळगाव फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

110

रावेर (शरीफ शेख) 

रावेर येथे फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 190 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप वधू पूजा करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी फुले शाहू आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे ,रावेर तालुका खान्देश माळी महासंघाचे अध्यक्ष पिंटूभाऊ महाजन, रवीभाऊ पाटील, संजय चौधरी, विजय गाढे सर,नंदलाल लवंगडे,महेश महाजन ,जितू माळी ,जयंत महाजन, जीतू पाटील, स्वप्नील बिऱ्हाडे, भूषण चौधरी, अजय संजय अहिरे, बाली महाजन, अनिल लोखंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.