Home जळगाव कायदेतज्ज्ञ सल्लागार पदी ऍड.धनराज पाटील यांची, तर अल्पसंख्यांक उर्दू प्रतिनिधी सल्लागार पदी...

कायदेतज्ज्ञ सल्लागार पदी ऍड.धनराज पाटील यांची, तर अल्पसंख्यांक उर्दू प्रतिनिधी सल्लागार पदी निवड

205

रावेर (शरीफ शेख)

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दि.02 जानेवारी, 2021 रोजी रावेर येथे शिक्षक सहकार संघटनेची तालुका बैठक आयोजित करण्यात आलेली होती. आजच्या या बैठकीत सर्वप्रथम संघटनेच्या दोन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या, त्यात शिक्षक सहकार संघटना- रावेर तालुक्याच्या तालुका कायदेतज्ज्ञ सल्लागार पदी रावेर चे श्री.ऍड.धनराज पाटील यांची, तर अल्पसंख्यांक उर्दू शिक्षक प्रतिनिधी सल्लागार पदी पाल उर्दू शाळेचे ग्रेटेड मुख्याध्यापक श्री.हनिफ शेख सर यांची सर्वानुमते आज बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. याची जाहीर घोषणा तालुकाध्यक्ष महेंद्र वंजारी यांनी केली. आज च्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावेर शिक्षण विभागाचे गट समन्वयक खलील तडवी सर, तर मुख्य अतिथी म्हणून संघटनेचे विभागीय सरचिटणीस जितेंद्र गवळी व जिल्हा प्रतिनिधी भीमसिंह दाभाडे हे होते.

आज बैठकीच्या सुरुवातीलाच सर्व पदाधिकारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली. यात शिक्षकांचा वेळेवर न होणारा पगार, ग्राम पंचायत निवडणुकीत दुर्धर आजार व वयोवृद्ध प्राथमिक शिक्षकांना व महिलांना ही मतदान अधिकारी म्हणून ड्युटी लावणे, शिक्षकांचे सेवा पुस्तक अपडेट न करणे, DCPS शिक्षकांना पूर्ण हिशोब न देता NPS फॉर्म भरणे, वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी चे प्रस्ताव अजून ही मान्य न होणे, स्थायित्व प्रमाणपत्र सध्या प्राप्त न होणे, शिक्षण विभागातील क्लार्क यांच्याकडून शिक्षकांना बोलण्यात योग्य वागणूक न मिळणे या सारख्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करून याविषयीचे निवेदन देण्याचा सर्वानुमते आज निर्णय घेण्यात आलेला आहे.

यावेळी संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष मानसी पवार, तालुका उपाध्यक्ष मनोज नेवरे, तालुका उपाध्यक्ष तेजपाल ठाकूर, तालुका चिटणीस चंद्रकांत पाटील, तालुका कार्यकारिणी सदस्य राजू चवरे, चंद्रकांत राऊत, महाजन सर प्रामुख्याने उपस्थित होते. सूत्र संचालन व आभार तालुका सरचिटणीस लतीफ तडवी यांनी केले.