Home विदर्भ यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे वसंत...

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर व शिवसेनेचे संजय दरेकर यांची निवड!

32
0

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर व शिवसेनेचे संजय दरेकर यांची निवड!
——————————
अयनुद्दीन सोलंकी

*घाटंजी / यवतमाळ -*

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकाधिक संचालक निवडून आले होते. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मनोहरराव नाईक, नागपूरचे माजी पालकमंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांनी अध्यक्षपदासाठी मनीष पाटील नावाचा आग्रह धरला होता, तर खासदार बाळु उर्फ सुरेश धानोरकर वा वणीचे माजी आमदार वामनराव कासावार यांनी टिकाराम कोंगरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. अखेर वणी विभागाला यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत टिकाराम कोंगरे यांची निवड करण्यात आली. या वेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, माजी गृहराज्यमंत्री माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे, विधान परिषद सदस्य, आमदार तथा यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग, माजी आमदार विश्वास नांदेकर, शिवसेनेचे राजेंद्र गायकवाड, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस अनिल गायकवाड या सह यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक आदी उपस्थित होते.