Home महत्वाची बातमी चक्क जन्मदात्या आईने चिमुकली मुलीला पाण्याच्या टाकीत बुडऊन मारून टाकले , ,

चक्क जन्मदात्या आईने चिमुकली मुलीला पाण्याच्या टाकीत बुडऊन मारून टाकले , ,

178

 

आईला अटक ,

 

अमीन शाह ,

मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच स्वतःच्या 2 महिन्याच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून संपविल्याचा धक्कादायक प्रकार वसई गावातील पाचूबंदर परिसरात घडला आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी क्रूरकर्मा मुलीच्या आईला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  वसई पाचूबंदर येथे इतुर कुटुंब राहत असून त्यांचा मासे सुकविण्याचा व्यवसाय आहे. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास या कुटुंबातील मेरी इतुर यांचे पती व त्यांची मोठी सून मासे सुकवत असताना घरातून जुळ्या मुलींपैकी एक मुलगी बेपत्ता झाल्याने  कुटुंबीयांच्या  मदतीने सर्वत्र शोधाशोध सुरू केला असता सदर मुलगी घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात भरती करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचाराआधीच तिला मृत घोषित केले

बातमी सोबत काल्पनिक चित्र आहे ,