
घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे
जालना जिल्ह्याच्या परतुर शहरातील माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे कार्यालयीन सहाय्यक मतीन मुसाभाई कुरेशी यांच्या स्कारपीओ गाडीला ३० डिसेंबर रोजी साडे तीन वाजता वाटूर मंठा रोडवर आकणी पाटीजवळ अपघात झाला, अपघातात गाडीने तीन पलट्या खाऊन ही केवळ दैव बलवत्तर म्हणून गाडीतील मतीन कुरेशी यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्यांच्या गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले.चालकाचा ब्रेक ऐवजी चुकून एक्सललेटर वर पाय पडल्याने ही घटना घडल्याचे उघड झाले.अपघातग्रस्त गाडीत मतीन कुरेशी यांचा भाऊ,आई व इतर होते.अपघाताची बातमी समजताच माजी आमदार जेथलिया यांनी सर्वांची विचारपूस केली. तर वाटूर फाटा येथील अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.केवळ सर्वांच्या सदिच्छा सोबत असल्याने इजा झाली नसल्याचे मत शेख मतीन व्यक्त केले.











































