Home विदर्भ रस्त्यालगतच्या दुभाजकावर झुडपे वाढल्याने अपघाताची संभावना , “रस्त्याच्या कडेला मातींचे ढिगे”

रस्त्यालगतच्या दुभाजकावर झुडपे वाढल्याने अपघाताची संभावना , “रस्त्याच्या कडेला मातींचे ढिगे”

141

संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

तळेगांव शा पंत  – रविंद्र साखरे

वर्धा –  तळेगाव येथील उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या रस्त्यालगत दुभाजकावर मांसाइव्हढी झुडपे वाढल्याने या ठिकाणावरून अवगमान करणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे दुचाकीस्वारांना येथून जाताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने एखादेवेळी या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे याच दुभाजकाच्या बाजूला माती व बारीक वाळूमिश्रित माती चे ढिगारे निर्माण झाले असल्याने यावरून जाताना वाहने घसरत आहेत. परिणामी वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहे. कित्येकदा या ठिकाणी आशा आशयाचे अपघात झाले आहे. त्यामुळे या विषयावर संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
उड्डाणपुलाच्या खाली घाणीचे मोठे साम्राज्य निर्माण झाले असुन ठिकठिकाणी कचरा, झुडपे, घाण, पाण्याच्या लोटांमुळे चिखल निर्माण झाला आहे. ज्यामुळे या पुलाखाली सामान्य माणूस जरा वेळ देखील उभा राहू शकत नाही. या उड्डाणपुलाच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या संबंधित समूहाने ही जबाबदारी झटकल्या गत परिस्थीती निर्माण झाली आहे. ज्यामुळे गावातील अनेकांचे जीव धोक्यात आले आहे. याकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे.