Home जळगाव “वाराई” न देणेबाबत ट्रक मालक असोसिएशन ची बैठक संपन्न

“वाराई” न देणेबाबत ट्रक मालक असोसिएशन ची बैठक संपन्न

265

रावेर (शरीफ शेख) 

शासन निर्णय – उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र.
युडब्ल्युए-२०१५/प्र.क्र. २०१८/कामगार ५ दि. ०६/०९/२०१६ नुसार ट्रक मधील माल काढणे व ट्रक मध्ये माल भरणे याकरीता ट्रक मालकांकडून “वाराई” घेतली जाते ती गैर कायदेशिर आहे, असा
शासन निर्णय झाला असुन शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून जळगांव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशन तर्फे काल बैठकीचे आयोजन टिक्की हॉल,
गणेशपुरी येथे करण्यात आले होते. जिल्ह्यातील दोनशे ट्रक मालक यावेळी उपस्थित होते.
ट्रकमध्ये भरलेला माल व खाली केला जाणारा माल याची सर्व खर्च संबंधित व्यापारी, कारखाना, आस्थापना यांचा असतो. मात्र गाडी खाली करणारे हमाल ट्रक
मालकाकडून “वाराई” च्या नावाखालील वसुली करतात. प्रसंगी धमकी देतात व सदर वाद भांडणापर्यंत जातो. याबाबत अनेक ट्रक मालकांनी शासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यावर उपरोक्त शासन निर्णय झाला आहे.
याबाबत ट्रक मालकांमध्ये अनास्था होती या करीता सदर बैठकीत माहिती देण्यातआली.
शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी हे माथाडी कायदा
अंमलबजावणी कृती समितीचे अध्यक्ष आहेत.
जास्तीत जास्त ट्रक मालकांना शासन निर्णयाची माहिती व्हावी म्हणून सोमवार दि. २८/१२/२०२० रोजी सकाळी १२ ते ३ चे दरम्यान शासन निर्णयाची प्रत-मोफत ट्रान्सपोर्ट नगर येथील ट्रक ओनर्स असोसिएशन तर्फे दिली जाणार आहे.
बैठकीला जळगांव जिल्हा ट्रक ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सैय्यद शाहीद, ऑल
इंडीया ट्रान्सपोर्ट कॉग्रेस चे जिल्हाध्यक्ष नईम मेमन, उपाध्यक्ष कल्पेश छेडा, जळगांव
ट्रान्सपोर्ट एजन्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष अशोक वाघ, कॉन्ट्रक्टर बाबुभाई, शरद
चव्हाण, हसद पठान, अमर ट्रान्सपोर्टचे खंडू भाऊ, अशपाक भाई, अख्तरभाई, हबीब
पटेल, साजीद भाई, मुजफ्फर भाई, हारून भाई, सादीक भाई वगैरे जळगांव जिल्ह्यातील
२०० ट्रक मालकांची यावेळी उपस्थित होते.