Home मुंबई माजीमंत्री शिवाजीराव मोघे व ईतरांविरुद्ध फसवणुक केल्या प्रकरणी अधिकचा तपास करुन न्यायालयात...

माजीमंत्री शिवाजीराव मोघे व ईतरांविरुद्ध फसवणुक केल्या प्रकरणी अधिकचा तपास करुन न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी…!

68
0

यवतमाळ –  घाटंजी तालुक्यातील कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची फसवणुक केल्या प्रकरणी अडीच वर्ष लोटुनही घाटंजी न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकचा तपास करुन अहवाल सादर केला नसल्याने, सदरचा अहवाल दाखल करण्यात यावा, अशी मागणी कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दिन सोलंकी यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ, उप विभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा यांचे कडे ईमेल द्वारे केली आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरणात राजकीय दबावाखाली घाटंजी न्यायालयात अधिकचा तपास करुन पारवा पोलीसांनी अहवाल सादर केलेला नाही, असा आरोप अयनुद्दीन सोलंकी यांनी केला आहे. 

◼️कुर्लीचे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर अध्यक्षपदी नियुक्ती करुन देतो म्हणून २५ लाख रुपये घेउन संशयीत आरोपी माजी मंत्री शिवाजीराव मोघे व तत्कालीन स्विय सहाय्यक देवानंद पवार यांनी विश्वासघात करुन फसवणूक केली, अशी लेखी तक्रार पारवा पोलीसांत केली होती. मात्र. पारवा पोलीसांनी राजकीय दबावाखाली संशयित आरोपी विरूध्द गुन्हे दाखल केले नाही. त्यामुळे सोलंकी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी याचीका दाखल केली. या प्रकरणात ज्येष्ठ वकील अँड. अनिल मार्डीकर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली होती. यात उच्च न्यायालयाने पोलीस अधीक्षक, ठाणेदार पारवा व ईतरांना नोटीस बजाउन उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. परंतु ; पोलीस अधीक्षक कार्यालयात नोटीस प्राप्त होताच तत्कालीन ठाणेदार पंजाब वंजारी यांनी संशयित आरोपी माजी मंत्री शिवाजीराव मोघे व तत्कालीन स्विय सहाय्यक देवानंद पवार विरुद्ध १ फेब्रुवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर प्रकरणात साक्षदार व लेखी पुरावे असतांना अगोदर तत्कालीन ठाणेदार पंजाब वंजारी व नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक आर. डी. वटाणे यांनी तपास केला. सदर प्रकरणात साक्षदार व ईतर लेखी पुरावे असतांना पोलीसांनी राजकीय दबावाखाली घाटंजी न्यायालयात ब समरी फायनल ३५/१५ दि. ७ नोव्हेंबर १५ रोजी पाठविला. या प्रकरणी फिर्यादी अयनुद्दिन सोलंकी यांचे तर्फे अँड. जगदीश वाधवानी (यवतमाळ) यांनी न्यायालयात आक्षेप अर्ज दाखल करुन युक्तिवाद केला. सदर प्रकरणात घाटंजी न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रभुषन ओंडरे यांनी ब समरी फायनल फेटाळून अधिकचा तपास करण्याचे आदेश २४ मे १८ रोजी पारवा पोलिसांना दिले. मात्र, पारवा पोलीसांनी अडीच वर्ष लोटुनही घाटंजी न्यायालयात अधिकचा तपास करुन अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी यांनी भादंवि कलम ४२०, ३४ प्रकरणात अधिकचा तपास करुन घाटंजी न्यायालयात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी, यवतमाळ व पांढरकवडा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे. या पुर्वी सुध्दा पोलीस महासंचालक मुंबई व पोलीस अधीक्षक यवतमाळ व पारवा पोलीस स्टेशन आदिंकडे सदर प्रकरणात तक्रार करण्यात आली होती, हे विशेष.