Home विदर्भ भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी प्रतिक कुलसंगे यांची...

भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी प्रतिक कुलसंगे यांची निवड

47
0

यवतमाळ – प्रतीक कुलसंगे यांची भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी निवड भाजपा जिल्हा अध्यक्ष नितीनजी भुतडा यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्हा महामंत्री राजू भाऊ पडगिलवार, रवी बेलुरकर,दत्ताजी रहाणे. जिल्हा कार्यालय मंत्री सुनील घोटकर, भा.ज.यु.मो जिल्हा अध्यक्ष आकाश धुरट, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माया ताई शेरे यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी प्रतिक कुलसंगे यांच्याकडे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या 

जिल्हा महामंत्रिपदाची जबाबदारी होती. ही नियुक्ती त्यांच्या राजकीय सामाजिक व इतर सर्वसमावेशक कर्तुत्वावर करण्यात आली असून या नियुक्तीमुळे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाची संघटनात्मक बांधणी आणखी मजबूत होईल असे मत नितीनजी भुतडा यांनी व्यक्त केले. या क्षणी संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.