Home विदर्भ बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड खटल्याकरीता नामवंत वकील उज्ज्वल निकम न्यायालयात दाखल.!

बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड खटल्याकरीता नामवंत वकील उज्ज्वल निकम न्यायालयात दाखल.!

37
0

योगेश कांबळे

न्यायालयाल परीसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात

– सर्वांच्या नजरा निकम यांच्या युक्तीवादाकडे

– १० महिने १३ दिवसांनंतर खटल्याला आला वेग

वर्धा – जिल्हातील हिंगणघाट येथील बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड प्रकरणात आता न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्रियेला वेग आला आहे.यासाठी सरकारी वकील उज्वल निकम आज हिंगणघाट न्यायालयात आहे. आजपासून
१० महिने १३ दिवसांनंतर हिंगणघाट येथील न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोप ठेवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.त्यानंतरच्या पुढील तारखेला सुनावणी बाबत प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
३ फेब्रुवारी २०२० रोजी प्राध्यापिकेंच्या अंगावर विकेश उर्फ विकी नगराळे याने पेट्रोल टाकून जाळले होते.या घटनेनंतर संपूर्ण राज्यात मोठा आक्रोश निर्माण झाला होता.यावेळी सर्वच स्तरातून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा व आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत होती.आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे सध्या नागपूर कारागृहात बंदिस्त आहे.आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे या खटल्यासाठी न्यायालयात हजर झाल्याने निकम यांच्या युक्तीवादाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.