Home विदर्भ देवी नगर लोहारा येथील नागरिक घरकुल‌ , बांधकाम नोंदणी पासुन वंचित

देवी नगर लोहारा येथील नागरिक घरकुल‌ , बांधकाम नोंदणी पासुन वंचित

327

यवतमाळ ‌- देवी नगर लोहारा येथील उमेश उपाध्ये व स्वर्गीय श्री विलास काका झेंडेकर यांच्या सहभागातून गावांमध्ये घरकुलाचा सर्वे केला होता नगर परिषदेच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ,

नगर परिषद मधील इंजिनियरला घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून सुद्धा या परिसरातील नागरिकांना मागील सहा – सात महिन्यापासून घरकुलासाठी आयोजन केले असून त्यांना घरकुल मिळाले नसून त्यांच्या घराची पाहणी, फोटो व त्यांची परिस्थिती पाहता त्यांना राहायला घरच नसून त्यांचे खूप हलाखीची परिस्थिती तर यामध्ये काही विधवा महिलांचा देखील समावेश आहे तसेच त्यांना घराची आवश्यकता असल्यामुळे स्वतः सर्वे करून त्यांच्या घर पावत्या , सर्व कागदपञे पूर्ण पाठवून सुद्धा नगर परिषद किंवा इंजीनियरी यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही.

सदर प्रकरणाला चार महिने झाले असुन काहीही घरकुल मध्ये नाव किंवा सदर कुठल्याही योजना त्यांना मिळाल्या नसून माननीय श्री मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना सांगत होते की साहेब आपल्यावर आम्हाला खूप विश्वास असून आपण शेतकऱ्यांसाठी खूप काही करतात आणि तेच लोक हे शेतकरी लोक आहे आणि गरीब रोज मजुरी करणारे लोक असून त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करावे ही तुम्हाला विनंती व आंदोलन केल्याने काही होत नसून खरोखर किती दुःखामध्ये कोण आहे गरीब वर्ग मजदूर आणि शेतकरी त्यांना घर नाही.
शेतकर्यांना , कामगार या सर्वांना घर मिळाले तर त्यांना सर्व काही मिळाल्यासारखे होईल . आम्ही आशा करतो की तुम्ही याची दखल घ्यावी .

तसेच परिसरातील नागरिकांनी बांधकाम इमारत मजदूर रोजगार हमीच्या पुस्तका करिता नागरिकांनी मागील एक वर्षापासून फॉर्म देऊन सुध्दा सर्वच फॉर्म रिजेक्ट करण्यात आले व त्यांना पुस्तक देण्यात न आल्याने एजंटमार्फत लोकांना पुस्तक मिळाले आहे , सर्व श्रीमंत लोकांना पुस्तके मिळाली असून आता ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .