Home महत्वाची बातमी अपघात ग्रस्त गणेशच्या मदतीसाठी सरसावली तरुणाई

अपघात ग्रस्त गणेशच्या मदतीसाठी सरसावली तरुणाई

58
0

देऊळगाव मही:प्रतिनिधी:रवि जाधव

ट्रॅक्टर चालवत असताना देऊळगाव महि येथील गणेश संजय शिंगणे यांचा 20 मार्च 2020 रोजी ट्रॅक्टर पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात त्याच्या मूत्रपिंडला व पोटाला जबरदस्त मार लागल्याने डाॅक्टरने त्यांना आॅपरेशन करण्याचा सल्ला दिला. परंतु त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कोणत्याही डाॅक्टरने आॅपरेशन होकार दिला नाही. गणेश शिंगणे यांना प्रत्येक वेळी दवाखान्यात तपासणीसाठी गेले असता आॅपरेशन साठी समोरील तारिख देण्यात आली. याकाळात 29 नोव्हेंबर पर्यंत गणेश यांच्याजवळ असलेली लाखभर रूपयांची जमा पुंजी दवाखान्यात संपुर्ण खर्च झाली. दरम्यान जवळील पैसे संपले , आॅपरेशन करण्यासाठी पैसे नाही.पाहुणे मंडळी व आप्तेष्टांनी सुध्दा पैसे न देता हात वरती केले. घरात अठराविश्व दारिद्र्य, घरात छोटी छोटी 3 चिमुकली मुले व जमिनीचा एक गुंठाहि नाही. ज्या घरात राहतात ते घर सुध्दा भाड्याने आहे. ऐन लाॅकडाऊनच्या काळात आपले पोट मारून गणेश यांच्या पत्नीने आपल्या मुंलाची व पतीची काळजी वाहिली. पण आता वेदना असह्य झाल्यामुळे गणेश यांच आॅपरेशन करणे जरूरी झाले. डाॅक्टरने ६० ते ७० हजार रूपये खर्च सांगितला. गणेश यांना आर्थिक मदतीची गरज आहे .हि बातमी गुरूकृपा मित्र मंडळाचे अध्यक्ष उमेश शिंगणे यांना गावातील मंडळींनी दिली. गणेश यांच्या आॅपरेशनची बाब लक्षात घेऊन. उमेश शिंगणे यांनी गुरूकृपा मित्र मंडळ, राष्ट्रमाता युवा स्पर्धा परीक्षा केंद्र व ज्ञानदर्शन अभ्यासिकेच्या सहायाने गावातुन गणेश यांच्या आॅपरेशन करण्यासाठी वर्गणी जमा करण्याची कल्पना मांडली व कार्यक्रमाची जबाबदारी घेतली. या योजनेसाठी सर्वानी होकार भरला .ठरल्याप्रमाणे सामाजिक बांधिलकी व समाजाच देण या तत्त्वावर२९ नोव्हेंबर रोजी एका मत पेटी द्वारे उपचारासाठी मदत गोळा करण्यात आली. हि मदत गणेश संजय शिंगणे व त्याच्या पत्नी यांना १८६१५ रूपयाची रक्कम हाॅस्पिटल खर्चासाठी गावकऱ्यां समक्ष सुपूर्द करण्यात आली .त्यावेळी हे कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रमाता स्पर्धा परीक्षा केंद्राचे सचालक :अनिलकुमार धारे सर,दत्ता शिंगणे,शाकीर पठाण,मनोहर चेके सर ,विकास कदम, विकास शिंगणे,ओम शिंगणे,स्वप्निल काकडे,राहुल काकडे,आकाश पिसे,समाधान शिंगणे,विर जिजोते,विकास जाधव,दिपक पंडित,गणेश डोईफोडे,दिपक जायभाये,शिवा चेके,अक्षय शिंगणे,धर्मा भाऊ, पिसे मामा,अमोल शिंगणे ,व गणेश बनसोडे यांनी मदत मिळवुन देण्यासाठि अथक परिश्रम घेतले. शेवटी दत्ता शिंगणे यांनी सर्व मंडळीची चहापाणाची व्यवस्था करून, मदत गोळा करण्याच्या कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या सर्व जनतेचे उमेश शिंगणे यांनी आभार मानले. या कार्यामुळे मदत मिळवुन देणार्या तरुणाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.