Home विदर्भ अखेर जांब ग्राम पंचायतीच्या सरपंचा अपात्र , एका जागेवरील राजीनामा न देने...

अखेर जांब ग्राम पंचायतीच्या सरपंचा अपात्र , एका जागेवरील राजीनामा न देने भोवले – “अप्पर आयुक्त यांचे आदेश”

45
0

यवतमाळ / घाटंजी- तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या जांब ग्राम पंचायतिच्या सरपंचा कांताबाई यादव कुडमते या २०१८ च्या सार्वत्रिक ग्राम पंचायत निवडणुकीत दोन ठिकाणावरून निवडून आल्या होत्या.

निवड झालेल्या दिनांकापासून सदर व्यक्तीने ७ दिवसाचे आत कोणत्याही एका जागेच्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक होते मात्र त्यांनी एकाही जागेवरील राजीनामा न दिल्याने सामाजिक कार्यकर्ते सैय्यद जावेद सैय्यद अमीर यांनी अप्पर जिल्हाधिकारी एस. बी. महिंद्रकर यांच्या न्यायालयात याचिका दाखल केल्या वरून कुडमते यांना अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र याला आवाहन देत सरपचा यांनी अप्पर आयुक्त अमरावती यांचे कडून स्थगिती मिळवली होती. या प्रकरणाची सुनावणी दरम्यान मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १३ चे नियम ४१(अ) नुसार राजीनामा विहीत मुदतीत न दिल्यामुळे मा. अप्पर आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांनी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम १९५९ चे कलम १४ (ग) नुसार सरपंच व सदस्य हे दोन्ही पद रद्द करण्याचा आदेश पारित केलेला आहे. त्यामुळे कलम ३५ पोटकलम (३) अन्वये सरपंच पद रिक्त झाल्यामुळे यांचे कडील प्रभार उपसरपंच राजेंद्र चंपत मडावी यांना देण्यात यावा असे आदेश गटविकास अधिकारी घाटंजी यांनी काढला आहे. अपील कर्त्याने कुठेही अपील केली तरी आपले पद जाणार नाही या आविर्भावात वावरणाऱ्या सरपंच कुडमते यांना अखेर पायउतार व्हावे लागले आहे. स्थगिती आल्यानंतर अप्पर आयुक्त यांच्या न्यायालयात अपील कर्ते सैय्यद जावेद सैय्यद अमीर यांचे कडून अड निलेश चवरडोल यांनी बाजू मांडली यात सैय्यद जावेद यांचे कडे सर्व पुरावे असल्याने अखेर कुडमते यांना दोन्ही पदाला मुकावे लागले.