Home विदर्भ चोरी करणार्या आरोपीचा अवघ्या चोविस तासात देवळी पोलीसांनी लावला शोध.!

चोरी करणार्या आरोपीचा अवघ्या चोविस तासात देवळी पोलीसांनी लावला शोध.!

117

योगेश कांबळे

देवळी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप

वर्धा – देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसगाव धनाडे येथे राहनारा दीपक साहेबराव भोकडे यास 23 नोहेबंर रोजी अज्ञात तीन इसमानी मोपेड वाहनानी येऊन . त्याचे जवळ वाहनाची किस्त भरण्याकरीता असलेले 65 हजार रूपये लाथाभुक्याने मारहान करुण व चाकुचा धाक दाखवून. चाकूने जखमी करुण जबरदस्तीने हिसकावून नेले. याबाबतची माहिती देवळी पोलीस स्टेशन ला प्राप्त झाल्याने देवळी पोलिसानी 24 तासाचे आत अज्ञात आरोपीचा छडा लावुन , एकूण 70.000 रूपये मुदेमाल हस्तगत केला आहे. सविस्तर वृत्त असे की दीपक साहेबराव भोकडे रा. सिरसगाव धनाडे हा दि 23 नोहेबंर रोजी दुपारी 1.30 वाजता गावातीलच राहनारा राजेंद्र उघडे याचे चारचाकी वाहनाचे किस्त भरण्याकरीता दिलेले 65हजार रूपये घेऊन, वायगाव मार्गे वर्धा जाण्याकरीता त्याचे दुचाकी वाहनाने निघाला असता , वायगाव रोडलगत भदाडी नदीचे पुलाचे अलीकडे त्याचे मागवुन एक पाढर्या रंगाचे मोपेडवर तीन इसम आले व त्यास ओव्हरटेक करुन गाडी आडवी करुण थाबवीले. व फिर्यादिस चाकु दाखवुन . तिघानी लाथाभुक्याने मारहाण व गोट्याने तोंडावर मारुन जखमी केले तसेच त्याचेतील एकाने चाकुने डोक्यावर मारुन जखमी केले. त्याचे जवळ असलेले 65 हजार रुपये जबरीने चोरुन पळुन गेले. अशी घटना झाल्याची माहीती फिर्यादिने प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला ला येवुन , दिल्याने लागलीच वेळ न घालवता. आरोपीचा शोधार्थ कर्तव्य दक्ष ठाणेदार नितीन लेव्हरकर त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी घटनास्थळी फिर्यादिसह जावुन, पडताळणी केली. घटनास्थळी गुप्त माहीतीदार लावुन तसेच आजूबाजूचे लोकांना विचारपुस करुन यातील अज्ञात आरोपीचा 24 तासाचे आत छडा लावन्यात आला आहे. सदर घटनेतील शोध लावण्यात आलेले आरोपी नामे राजू सयाम रा देवळी, अक्षय पाटील रा. देवळी, रंजित पारीशे रा. देवळी याना निष्पन्न करुन त्याना ताब्यात घेण्यात आले .
त्यांना घटनेबाबत सवीस्तर विचारपुस करण्यात आली असून. त्यानी जबरीने हिसकावुन नेलेले रकमेमध्ये 3 मोबाईल खरेदी केल्याची कबूली दिलेली आहे. व त्यासहीतच या प्रकरणात यात आणखी काही वैयक्तिक वादापोटी आरोपी असल्याची महीती प्राप्त झालेली आहे. यातील आरोपीकडून त्यानी खरेदी केलेले 3 मोबाइल व गुन्हयांत वापरलेले मोपेड वाहन असा 70 हजार रुपये मुद्देमालसह देवळी पोलीसांनी हस्तगत केलेला आहे. सदर प्रकरणात पो. स्टे.ला अप.क्र.925/20 कलम 326,394 भादपी प्रमाने गुन्हा दाखल नोंद, यातील आरोपीचा शोध पोलिस अधिक्षक प्रशांत होळेकर याचे मार्गदर्शनात, व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. तृप्ती जाधव याचे सुचनेप्रमाने ठाणेदार नितिन लेव्हरकर पुढील तपास करीत आहे.