Home विदर्भ अडगाव येथे चोरट्यांचा हैदोस तिन ठिकाणी घरफोड्या

अडगाव येथे चोरट्यांचा हैदोस तिन ठिकाणी घरफोड्या

96

चार लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल

आलेगाव प्रतिनिधि

अकोला – पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत अडगांव येथे १६ नोहेंबर रोजीच्या मध्य रात्री अज्ञात चोरट्यांनी रात्रभर धुमाकूळ घातला.चोरट्यांनी धुमाकूळ घालून तिन दरवाजे कुलूप फोडून, व कपाट पेटया फोडून ५०० मीटर अंतरावर फेकून दोन घराच्या पेटया फेकलेल्या अवस्थेत काही नागरिकांना सकाळी दिसून आल्या व घरफोड्या केल्याचे गावामध्ये एकच खळबळ उडाली . अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास.केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १;३० वाजताच्या सुमारास घडली.
अडगांव येथील भिभराव काठोळे,यांच्या घरातील सोन्याचे दागींने ५३ हजार व १ लाख ५ हजार रुपयांचे दागींने व रोख ४३ हजार ५०० रुपये तसेच संतोष पाचपोर ,यांच्या घरातील सोन्यांचे दागींने १ लाख सहा हजार रुपयांचे दागींने व रोख ४५ हजार रुपये लंपास,व देवराव पाचपोर,यांच्या घरातले ५ हजार रोख सहा अज्ञात चोरट्यांनी एकूण ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.या तिन्ही ठिकाणी मुख्य व्दाराला लावलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला.तसेच सोन्याचे व दागिन्यांसह रोख लंपास केली.घटनेची माहिती अडगांवचे पोलीस पाटील पद्माकर पाचपोर,यांनी भ्रमणधीनी द्वारे माहिती देताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ,हे आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.निरीक्षक नितीन शंकर शिंदे,उपनिरीक्षक रामराव राठोड,सहाय्यक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर,बालाजी सानप,सुधाकर करवते,येवले,आदिंनी पंचनामा केला आहे. ठाणेदार यांनी माहीती मिळताच श्वाण पथक व फिंगरप्रिंट,एक्सपर्ट, डाँग,मोबाईल फॉरेन्सिक इंटरनॅशनल व्हेन यांनाही पाचारण करण्यात आले होते.याप्रकरणी चान्नी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासाला सुरुवात केली आहे. बाळापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली.