Home विदर्भ भिडी आकोली मार्गावर नागरिकांच्या दफन आंदोलनाला यश..!

भिडी आकोली मार्गावर नागरिकांच्या दफन आंदोलनाला यश..!

132

योगेश कांबळे

वर्धा – देवळी तालुक्यातील भिडी – आकोली मार्गावर गेल्या दोन वर्षापासून रस्त्याच्या दुरूस्ती करीता या परिसरातील नागरिकांनी निवेदन दिलेत. पंरतु बांधकाम विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले होते. आकोली, लोणी, तळणी, इंझाळा, चोंडी व इतर गावातील नागरिकांचे रस्ताच्या अभावी हाल होत होते.कारण अपघाती रस्ता असल्याने एस.टी.बस सुद्धा बंद करण्यात आली होती. त्यामुळे  देवळी येथील युवा संघर्ष मोर्चाच्या वतिने हे आदोंलण छेडण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये भिडी, आकोली, लोनी, तळणी, इंझाळा, चोंडी व इतर 13 गावातील नागरिक व सरपंच महोदय यांच्या द्वारा जीवघेणा खचलेला पूल बांधकामासाठी आज मंगळवारी सतरा नोहेबंर रोजी दुपारी अकरा वाजता दफन आंदोलन करण्यात आले.
मागील एक वर्षांपासून भिडी आकोली मार्गावर भिडी पासून एक किलोमिटर अंतरावर पुलाजवळ मोठा जीवघेणाखड्डा पडला आहेत. यातून गाडी काढतांना जीव धोक्यात घालून गाडी काढावी लागते. यासाठी आजूबाजूच्या गावकरी व सरपंच यांनी मागील एक वर्षांपासून पालकमंत्री यांना निवेदन , पत्रव्यवहार केला यानंतर सरकार बदलले, पालकमंत्री बदलले परंतु समस्या मार्गी लागली नाहीत. मागील सहा महिन्यांपासून या खड्य्यामुळे पुलगाव – भिडी बस सहा महिन्यापासून बंद झाली आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लावत आहेत. व बस अभावी आगामी काळात विध्यार्थी शाळेत कसे जानार हा ही प्रश्न आहेत.रस्त्याच्या दुरुस्ती करीता किरण ठाकरे यांनी स्वतः ला अर्धे दफन करून आंदोलण केले.
आदोलंणाची दखल घेतल्या जावून तहसीलदार राजेश सरवदे व बांधकाम विभागाचे अंभियंता पैठणकर यांनी आंदोलण ठिकाणी येवून रस्त्याची दुरुस्ती करण्याचे आश्वासन देवून उद्यालाच खड्डे बुडविण्याची सुचना संबंधित ठेकेदारास दिल्या ने फार मोठे यश युवा संघर्ष मोर्चाला व गावातील नागरिकांना मिळाले असून भिडी परिसरातील नागरिकांनी युवा संघर्ष मोर्चाचे आभार माणले आहे.