जळगाव

नेरी येथे भीषण अपघातात पिता पुत्र झाले ठार

नेरी जी. जळगाव:(एजाज़ गुलाब शाह)
जामनेर तालुक्यातील वाघारी येथून नेरीच्या गुरांच्या बाजारात येत असताना पिता पुत्र अपघातात जागीच ठार झाल्याची घटना नेरी ता. जामनेर जी. जळगांव येथे बाजार समितीसमोर १७ नोवेम्बर मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.

रशीद कालू कुरेशी वय६५, मुलगा आबिद रशीद कुरेशी वय २५ (रा. वाघारी ता. जामनेर ) असे या मृत पिता- पुत्रांची नावे आहेत. दोन्ही जण येथील गुरांच्या बाजारात गुरे ढोरे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते. मंगळवारी या बाजारात आल्या नंतर बाजार समितीच्या बाहेर आपली दुचाकी लावण्यासाठी मोकळ्या जागेच्या शोधात असताना अचानक दुचाकी घसरली आणि त्याचवेळी शेजारून आलेल्या माल वाहतूक ट्रकच्या दोन्ही चाकांखाली दोघे पिता पुत्र सापडले यात त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752