Home जळगाव राजस्व अभियानांतर्गत महसूल विभाग आणि आदिवासी एकता संघर्ष समिती च्या वतीने आधार...

राजस्व अभियानांतर्गत महसूल विभाग आणि आदिवासी एकता संघर्ष समिती च्या वतीने आधार कार्ड कॅम्प

130

आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रा जयश्री दाभाडे यांचा उपक्रम…!

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रुबजी नगर भागात आदिवासी भिल्ल वस्ती मध्ये राजस्व अभियानांतर्गत महसूल विभाग अमळनेर आणि आदिवासी एकता संघर्ष समिती च्या संयुक्त विद्यमाने आधार कार्ड नोंदणी अभियान राबविण्यात आले.

आदिवासी जमातींसाठी शासनाच्या विविध योजना असतात परंतु आदिवासी बांधवांकडे अनेक प्रकारच्या कागदपत्रांची कमतरता असते.आता आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. यातील लागणारे मुख्य कागदपत्रे म्हणजे रेशनकार्ड, आधार कार्ड देखील बहुतेक आदिवासींकडे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि विविध योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे यांनी सातत्याने अमळनेर उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे तसेच तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या शी चर्चा करून आतापर्यंत नवीन शिधापत्रिका तसेच दुय्यम शिधा पत्रिका चे शेकडो अर्ज महसूल विभागात जमा केले आहेत. यातील अनेक आदिवासींना शिधा पत्रिका वाटप करण्यात आले आहे.

याच अभियानाचा दुसरा टप्पा म्हणजे आदिवासी बांधवाचे नवीन आधार कार्ड तसेच नाव दुरुस्ती, जन्म तारीख दुरुस्ती, पत्ता दुरुस्ती यासाठी आज रुबजी नगर येथील आदिवासी भिल्ल वस्तीत राजस्व अभियानांतर्गत आधार कार्ड कॅम्प घेण्यात आला आहे. या कॅम्प मधून जवळपास 100 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना आधार कार्ड मिळत आहे.
यावेळी आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे,राष्ट्रीय एकता परिषदेचे सदस्य आनंद भिल ,मंगल अंकुश भील, सुनील नामदेव भिल, दिपक फकीरा मोरे (भिल) ,देवा संतोष भिल इ उपस्थित होते.