Home विदर्भ मुंबई आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म महोत्सवात फुग्गा लघु चित्रपटाला द्वितीय क्रमांक

मुंबई आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म महोत्सवात फुग्गा लघु चित्रपटाला द्वितीय क्रमांक

53
0

अमरावती / वरुड  –  पीकरेअर स्टुडिओ मुंबई द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट स्पर्धेत पुन्हा एकदा अमरावतीच्या फुग्गा या लघुचित्रपटाने बाजी मारली असून, द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. सदर महोत्सवाचे डायरेक्टर चेतन मुदगल हे असून ते स्वतः लेखक दिग्दर्शक अभिनेते आहेत . 

अमरावतीचे लेखक दिग्दर्शक अभिनेते धर्मा वानखडे यांनी एक वर्षा अगोदर ही फिल्म तयार केली होती..ह्या फिल्म ला गोवा, मुंबई, पूना, सोलापूर, कोल्हापूर अश्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात तब्बल 13 पुरस्कार प्राप्त असून महाराष्ट्र शाशन आरोग्य विभाग आयोजित महोत्सवात सुद्धा पुरस्कार प्राप्त झाला होता.
धर्मा वानखडे यांचे चित्रपट क्षेत्रातील कुठलेही अधिकृत कोर्सेस झाले नसतांना सुद्धा त्यांच्या सर्वच शॉर्ट फिल्म ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले असून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवीत आहे हि फार मोठी उपलब्धी आहे.
फुग्गा फिल्म हि अस्तित्व बहुउद्धेशीय संस्थेच्या अध्यक्षा ज्योती वानखडे यांनी निर्मित केली असून, धर्मा फिल्म्स अमरावती यांनी प्रेसेंट केली आहे. सदर फिल्म हि सामाजिक विषयावर असून,
लघुचित्रपटाचे लेखन दिगदर्शन धर्मा वानखडे यांनी केले असून, सहाय्य्क दिगदर्शक निलेश ददगाल, सागर भोगे, एडिटर भारत वानखडे, रंगभूषा वेशभूषा विनयकुमार भगत, कार्यकारी निर्माता मनीष टवलारे, इत्यादींनी काम पाहले असून सदर शॉर्ट फिल्म मध्ये सपना बटुले, धर्मा वानखडे प्रणव साबळे, अक्षय नगराळे, भारत वानखडे, विजय साबळे, बंडू सदाशीव यांनी अभिनय केला आहे.