Home मराठवाडा ती दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या आनंदात गावी येत होती मात्र प्रियकराने रस्त्यातच...

ती दिवाळी साजरी करण्यासाठी मोठ्या आनंदात गावी येत होती मात्र प्रियकराने रस्त्यातच दिला दगा ,

45
0

माणुसकीला काळिमा फासणारी घटना ,

अमीन शाह ,

बीड ,

पुणे येथून आपल्या गावी दिवाळी व भाऊबीज साजरी करण्यासाठी मोठ्या आनंदात ती गावी परतत होति मात्र धोखेबाज प्रियकराने वाटेतच डाव साधला तिला रस्त्यात उतरवून तिच्या अंगावर एसिड टाकले ती ओरडत असतांना शेवटी जाता जाता
तिच्या अंगावर गाडीतील पेट्रोल टाकून काडी लावली ती मेली असे समजून तो पळून गेला जिवंत जाळल्याची घटना येळब घाट परिसरात शनिवारी रात्री घडली होती 10 तास ही तरुणी मदती साठी ओरडत होती या अंगावर शहारे आणणारी संतापजनक घटना अशी की पुणे बीड रस्त्यावर एक तरुणी जवळपास 10 तास रस्त्या लगतच्या खड्ड्यात पडली होती . ती मदतीसाठी ओरडत असतांना रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना आवाज ऐकू आल्यावर जवळ जाऊन पाहिले असता त्यांना तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली . लगेच काही वाहनधारकांनी या बाबत पोलिसांना माहिती दिली . त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी तरुणीला बीड येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले तिच्यावर उपचार सुरू असतांना आज तिची प्राणज्योत मालवली . काळीज हेलावून टाकणाऱ्या या घटनेबद्दल मिळालेल्या माहिती नुसार , नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगावतील साविता ही २२ वर्षांची तरुणी त्याच गावातील अविनाश राजुरे याच्या सोबत पुण्यात लिव्ह इन रिलेशन मध्ये राहत होती . १३ नोव्हेंबर रोजी ते दोघे दुचाकी वरून गावी येण्यासाठी निघाले होते . पहाटे ३ च्या सुमारास निर्मनुष्य असलेल्या येळब घाट परिसरातील मांजरसुबा -केज रस्त्यावरून जात असताना अविनाश राजुरी ने गाडी थांबवली . त्याने आपल्या जवळील ऍसिड काढले व काही समजण्याच्या आतच सविता च्या अंगावर टाकले , त्या राक्षसा चा ईतक्यावरच समाधान झाला नाही तर त्याने गाडीतील पेट्रोल काढून तिच्या अंगावर टाकले आणि आग लावून दिली . आणि तो तेथून पसार झाला . रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना ओरडण्याचा आवाज येत असल्याने नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना रस्त्याच्या कडेला खड्ड्यात तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली . त्यांनी लगेच पोलिसांना कळविले . घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी गंभीर जखमी तरुणीला स्वतःच्या गाडीतून बीड येथील रुग्णालयात भरती केले . खेदजनक बाब अशी की रात्री ३ ते दुपारी २ वाजे पर्यंत सदर तरुणी वेदनेने विव्हळत होती आज तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली ,

मृत्यूपूर्व जवाब गुन्हा दाखल ,

या संतापजनक घटनेतील मृतक तरुणीने ठाणेदार लक्ष्मण केंद्रे यांच्या समक्ष मृत्यू पूर्व जवाब दिला असून मृतक तरुणीच्या ज्वाबा वरून पोलिसांनी अविनाश राजुरी रा , शेळगाव जी , नांदेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटने मूळे खळबळ उडाली असून लक्ष्मी पूजन च्या दिवशीच ही घटना घडल्या मूळे हळहळ वयकत केली जात आहे ,