Home विदर्भ ठाणेदार नितीन लेव्हरकर यांचा नागरिकांना सतर्कतेचा संदेश

ठाणेदार नितीन लेव्हरकर यांचा नागरिकांना सतर्कतेचा संदेश

39
0

योगेश कांबळे

देवळी शहरातील व परिसरातील नागरिकांना दिल्या सतर्कतेच्या सूचना. 

वर्धा – देवळी पोलीस स्टेशन प्रशासन तर्फे देवळीतील नागरिकांना आणी आजू बाजूच्या ग्रामीण भागात राहण्याऱ्या नागरिकांना ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्हात आणी लगतचे जिल्ह्यात मालमतेचे गंभीर गुन्हे घडलेले असून याची खबरदारी म्हणून देवळी पोलिसांनी काही नागरिकां साठी सूचना तयार केल्या आहे. घरा मध्ये आणी व्यवसाय प्रतिष्ठानात मौल्यवान वस्तू , दागदागिने हे सुरक्षित ठिकाणी किंवा बँक लॉकर मध्ये ठेवाव्या, नागरिकांना कोणतेही अपरिचित व्यक्ती, संशयित व्यक्ती, गुन्हेगारी प्रवूत्तीचे व्यक्ती आढळल्यास त्वरित देवळी पोलीस किंवा सबंधीत अधिकारी याच्याशी संपर्क साधावा , कुठे बाहेर गावी जात असल्यास घरामध्ये नगदी रुपये , मौल्यवान वस्तू ठेवू नये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या . बाहेर गावी जाताना यांची माहिती शेजारी यांना जरूर द्यावी आणी लक्ष ठेवण्यास सांगावे , आपले व्यवसाहिक प्रतिष्ठान आणी घराचे आजूबाजूला CCTV कॉमेरा लावण्यास प्राधान्य द्यावे . आपली आणी आपल्या मालमतेचि सुरक्षितता ही पोलिसांची नैतिक जबाबदारी आणी प्राथमिकता आहे .त्यामुळे नागरिकांनी देवळी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे आणी काही अडचण असल्यास तात्काळ देवळी पोलीस स्टेशन 07158 – 254133 यांच्याशी किंवा देवळीचे ठाणेदार नितीन लेव्हरकर याच्याशी 9823939433 या नंबरवर संपर्क साधावा. नागरिकांनी दिलेली माहिती ही गुप्त ठेवल्या जाईल. या आशयाचे पञक पोलीस शिपायांनी प्रत्यक्ष व्यावसायिक यांना वाचन करायला लावून त्यांना मिळाल्याची पोच पावती म्हणून दिलेल्या पञकावर सह्या करायला लावून जनहितासाठी हा उपक्रम राबवित ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी नागरिकांना सतर्कतेचा संदेश दिला आहे.