Home जळगाव मुस्लीम मनियार बिरादरी तर्फे आशादीप महिला वस्तीगृहात दिवाळी निमित्त फराळा सह नवीन...

मुस्लीम मनियार बिरादरी तर्फे आशादीप महिला वस्तीगृहात दिवाळी निमित्त फराळा सह नवीन कपडे वाटप

109

 

अखंडित दहा वर्षापासून राबविला जात आहे उपक्रम

रावेर (शरीफ शेख)

जळगाव – जळगाव मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अंतर्गत जळगाव येथील आशादीप महिला वस्तीगृहात सामुहिक दिवाळी साजरी करण्यात येत आहे. त्याप्रमाणे आज सुद्धा सदरची दिवाळी या अनामिका, पीडित, अत्याचारित व कुमारी मातां सोबत जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी ने महिला बाल कल्याण विभागाच्या समुपदेशक विद्या सोनार,शोभा हंडोरे व महिला सल्लागार समिती सदस्य श्रीमती निवेदिता ताठे यांच्या सह साजरा केला.

यांची सुद्धा होती उपस्थिती

मानियार बिरदारीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख, शहराध्यक्ष सय्यद चाँद, खजिनदार तय्यब शेख, सदस्य ॲडव्होकेट अमीर शेख व सहसचिव अल्ताफ शेख तर आशादिप महिला वस्तीगृहाचे एस शेलोळे, एस ठाकरे व श्रीमती सुनंदा पोतदार उपस्थित होते.

पीडित व चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर खुलले हास्य

मुस्लिम मानियार बिरादरीचा गेल्या दहा वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे आशादीप मधील वस्तीगृहातील चिमुकल्यांना सुद्धा नवीन कपडे सह मिठाई मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले वस्तीगृहातील या पीडित व बालकां सोबत मुस्लिम समाजाच्या तरुणांनी दिवाळी साजरी केल्याचा आनंद हा शब्दातीत आहे अशी भावना मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी व्यक्त केली.

भाऊ बीज चे स्वरूप

मुस्लिम मानियार बिरादरी चे कार्यकर्ते हे वसतिगृहातील पीडिता सोबत आपल्या लहान बहिणी समजूनच भेटतात त्यांच्या अडचणी अयकून घेतात त्यांच्या सोबत बसून त्यांच्याशी संवाद साधतात, या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळण्यामागे एकमेव कारण म्हणजे त्या पीडित अत्याचारित महिलांना आपल्या या बहिणी मानून मुस्लिम मन्यार बिरादरी सतत त्यांना सहकार्य करीत असल्याने तेथील भगिनींना खरी भाऊबीज असल्याचा आनंद मिळतो व मिळालेले नवीन कपडे साड्या फराळ यांच्यामुळे ते उत्साहित होतात.

लहान चिमुकल्या ला घेतले आपल्या कुशीत

सदर कार्यक्रम सुरू असताना एक कुमारी मातेचा मुलगा अत्यंत उत्साहाने फारुक शेख यांच्या जवळ आल्याने त्यास फारुक शेख यांनी प्रेमाने आपला नातू समजूनच आपल्या कुशीत घेतले असता तोही त्यांच्या कुशीत सामावून गेला व त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

पीडिता सोबत यांनी साधले भावनात्मक सुसंवाद

निवेदिता ताठे यांनी दरवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. विद्या सोनार व शोभा हंडोरे यांनी शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या बाबत व मुस्लिम मानियार बिरदारीच्या कार्य बाबत माहिती सादर केली तर फारुक शेख यांनी पीडितां सोबत संवाद साधून त्यांना पूर्ण विश्वासात घेतले व आपणा सोबत आम्ही नव्हे तर सम्पूर्ण समाज आहे,आपण कडून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष चुका झाल्या असल्या तरी ते पुनःश्च होता कामा नये याची भविष्यात खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशादीप महिला वस्तीगृहाच्या सुनंदा पोतदार यांनी केले तर आभार कनिष्ठ लिपिक एस एस ठाकरे यांनी मानले.