Home विदर्भ यवतमाळ तालुक्यात कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाची ” क्रांती “

यवतमाळ तालुक्यात कार्यकर्त्यांच्या पक्ष प्रवेशाची ” क्रांती “

45
0

देवानंद जाधव

यवतमाळ – अतुट आत्मीयतेच्या विलोभनीय धाग्यांनी आपल्या सर्वांची मने एका धाग्यात ओऊन ,सर्वांनाच हवाहवासा वाटणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष. अशी साधी सोपी आणि भावपुर्ण व्याख्या,राष्ट्रवादी काँग्रेस महीला काॅग्रेसच्या मुलुख मैदान तोफ तथा जिल्हा अध्यक्ष क्रांती जांबुवंतराव धोटे यांनी मांडली. त्या तालुक्यातील मंगरूळ ( साखर कारखाना) येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता पक्ष प्रवेश कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी जिल्हाभरातील असंख्य कार्यकर्त्यांनी क्रांती जांबुवंतराव धोटे यांच्या ऊपस्थीतीत प्रवेश घेतला.
मंगरूळच्या कार्यक्रमांमध्ये पक्ष प्रवेशाची एक नवी क्रांती झाल्याची भावना ऊपस्थीत तमाम कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष हरिष चव्हाण होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ओ.बी.सी विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पोतगंटवार ,पक्षाचा कणखर आवाज असलेले हरिष कुडे, जिल्हा उपाध्यक्ष रंजना आडे. प्यारेलाल सगणे, अजाबराव वलके ऊपसरपंच, निशांत हलबी ताहीर खान, हारुन खान.,ऊप तालुका प्रमुख सय्यद जाकीर सय्यद ऊमर, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना क्रांती जांबुवंतराव धोटे म्हणाल्या, ऊचला पावलांना,जरी अंधारली वाट आहे ही कालराञ संपताच सोनेरी पहाट आहे राजकारणाच्या सारीपाटावर अनेकदा जय पराजयाचा डाव खेळला जातो. माञ कुणाला हरविण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करुन, सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे असे क्रांती धोटे म्हणाल्या. कार्यकर्त्यांनी कार्य करत राहावे यश आपल्या पायाशी लोळण घेईल हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. *चिमणीच्या फडफडीने गरुड झेप थांबत नसते, आणि स्वयंप्रकाशित सुर्याला, आभाळातील काळी ढगं फार काळ रोखत नसते* असी डरकाळी फोडून पक्ष प्रवेश करणा-या ऊपस्थीत तमाम कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. शिवाय आयुष्यात दुःखाच्या गणिताला सोडविण्याचे सुञ सांगीतली. तेव्हा
कार्यक्रमात ऊपस्थीत अवघ्या कार्यकर्त्यांनी केलेला टाळ्यांचा कडकडाट आभाळ चिरत गेला, *कश्ती हर तुफान से गुजर सकती है,
बुझी हुई शमा फिर से जल सकती है,
हौसले मत हार, इरादे मत बदल,
किस्मत कभी भी बदल सकती है.
अशा हृदयस्पर्शी आणि भावपुर्ण शायरींच्या माध्यमातून शब्द सुमनांची उधळण केली,
आणि सोन्या च्या नंदादीपात तेवत राहणार्या तुपाच्या फुलवातीं प्रमाणे, आपल्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण आजीवन आनंदाने झळकत राहो अशा दिपावलीच्या शुभेच्छा देताच, अनेकांचे डोळे डबडबुन आले. अन कळत नकळत विदर्भविर भाऊ जांबुवंतराव धोटे याची स्मृती काळजाला स्पर्श करून गेली.
एकंदरीत वाघीण आली, अन् मने जिंकून गेली. अशीच भाव विभोर भावना सर्वांची झाली.
अशा बहुआयामी कार्यक्रमाचे बहारदार सुञ संचालन आणि आभार प्रदर्शन पञकार देवानंद जाधव यांनी केले.