Home महत्वाची बातमी चार कोटी रुपायांची कँश घेऊन चालकाने केला पोबारा ,

चार कोटी रुपायांची कँश घेऊन चालकाने केला पोबारा ,

90

 

 

 

 

 

विरार ,

दिवाळीच्या पूर्व संध्येला अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत  एटीएम मध्ये रोकड भरण्यासाठी आलेल्या व्हॅनचा चालक एटीएम व्हॅन घेवून फरार झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध सुरु करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार  गुरवारी संध्याकाळी पाचच्या च्या सुमारास विरार पश्चिम येथील बोळींज येथे असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीम मध्ये रोख रक्कम भरण्यासाठी बँकेची गाडी आली होती. यात दोन सुरक्षा रक्षक आणि एक मदतनीस होता. यावेळी एटीएम  सेंटरजवळ व्हॅन उभी असताना सुरक्षा रक्षक आणि मदतनीस एटीएम  मशीन उघडण्यात व्यस्त असताना  व्हॅनचा चालक फायदा घेऊन व्हॅन घेऊन पळाला.
या व्हॅनमध्ये ४.२५ कोटी रुपयाची रोकड असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त विरार रेणुका बागडे यांनी दिली. बागडे यांनी सांगितले कोटक महिंद्रा बँकेच्या फिर्यादीनुसार अर्नाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथकं रवाना झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास सुरु आहे