Home विदर्भ कानगांव कोसुर्ला रस्त्यावर पुलाच्या खड्ड्यात मोटरसायकल स्वाराचा अपघाती मृत्यू , ” दोन...

कानगांव कोसुर्ला रस्त्यावर पुलाच्या खड्ड्यात मोटरसायकल स्वाराचा अपघाती मृत्यू , ” दोन वर्षापासून पुलाचे बांधकाम अपूर्णच”

41
0

योगेश कांबळे

वर्धा –  जिल्ह्यातील हिगंणघाट तालुक्यातील कानगांव नजीकच्या वाहनाऱ्या 257 नंबर च्या राज्यमार्गांवरील कानगाव -कोसुर्ला मार्गांवर कानगाव वरून 2 किमी अंतरावर पुलाचे बांधकाम अर्धवट असलेल्या नाल्यावरील पुलाच्या खड्ड्यात इसमाचा मोटरसायकल सहित मृतदेह पडून असल्याचे घटना आज दुपारी उघडकीस आली.
शेतातील शिवारातील लोकांना आज दुपारी निदर्शनास आली. गेल्या दोन वर्षा पासून या राज्यमार्गांवर नाल्यावरील पुलाचेबांधकाम संथगतीने सुरु आहे. याबाबत.आधी पण अर्धवट बांधकाम मुळे अपघातची शक्यता दर्शविन्यात आली होती. परंतु दोन वर्षाचा कालावधी लोटूनही पुलाचे काम अर्धवट पडून आहे. या वर्धा -राळेगाव ला जोडणारा मार्गांवर मोठया प्रमाणात वाहनची वर्दळ असते. परीणामी रात्रीबेरात्री दुचाकी सह इतरवाहनधारकांना चालकाला रस्त्यावर अर्धवट बांधकाम चा अंदाज येत नाही. परीणामी आज दुचाकीचालकचा पुलाच्या खड्ड्यात अपघाती मृत्यू घडल्याची घटना घडली. याबाबत नागरिकांनी अल्लीपूर पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती दिली. घटना स्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी पाठविन्यात आले. पुढील तपास ठाणेदार शेळके करीत आहे.