Home विदर्भ वनमजुरांच्या मजुरीचे अपहार प्रकरण…,वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे मुख्य वनसंरक्षक यांचे आदेेश

वनमजुरांच्या मजुरीचे अपहार प्रकरण…,वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे मुख्य वनसंरक्षक यांचे आदेेश

89

हिवरी वन परीक्षेञात खळबळ

देवानंद जाधव

यवतमाळ – वन विभागा अंतर्गत हिवरी वन परीक्षेञातील नाकापार्डी वर्तुळात ,तत्कालीन वनपाल शेखर साठे यांनी मजुरांच्या मोठा अपहार केल्याची तक्रार रोजंदारी वन मजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी मुख्य वनसंरक्षक यांचे कडे नुकतीच केली होती. याची गंभीर दखल घेत मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी ऊप वन संरक्षक ( प्रादेशिक) यांना तत्कालीन वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे आदेश दिले आहे, त्यामुळे हिवरी वनपरीक्षेञात सन्नाटा पसरला आहे. सालोड, घाटाना, बारडतांडा, लोणी आदी बिट मध्ये वनीकरणाच्या संरक्षणासाठी रोजंदारी वन मजुर नेमले आहेत, वन विभागाच्या नियमानुसार मजुरांना रक्त, आणि घामाचा मोबदला न देता केवळ नाममाञ २००रुपयावर बोळवण केली जात होती. रोजंदारी वन मजुर नामदेव चंपत राऊत, चिंतामण नारायण येसनसुरे, शंकर शेषेराव पवार, सज्जन चंपत गायकवाड,संकेत विनोद चोले, गणेश पुनाजी फेंडर यांना मागील पाच सहा महिन्यापासून मजुरची रक्कम मिळाली नाही. शिवाय मुख्य तक्रारकर्ता चिंतामण नारायण येसनसुरे यांना तब्बल सोळा महीन्यापासुन वंचित ठेवण्याचे पाप हिवरी वन विभागाने केले. चिंतामण ची लाडाची लेक अत्यंत सिरीयस असुन अंथरुणावर निश्चल पडलेली आहे, पैस्या अभावी पोटगोळ्यावर ऊपचार करणे शक्य नसल्याने पती पत्नी छाती बडवुन लेकीच्या खाटेजवळ रडत बसले आहेत. नाका तोंडात पाणी गेल्यानंतर, वंचित, शोषित, पिडीत, वनमजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी वनमंञ्यांच्या घरावर तरी थाप मारली, तक्रार दिली, यवतमाळ विभागाचे प्रादेशिक वनसंरक्षक यांनी या वन मजुराचे अश्रु पुसत, विनाविलंब तत्कालीन वनपाल शेखर साठे यांच्या चौकशीचे आदेश दिले. तक्रारीत नमुद तमाम बाबीवर आवश्यक चौकशी करुन कडक कारवाई करण्याचे आदेश ऊपवनसंरक्षक यवतमाळ यांना दिले आहे. दोषी वनपाल आणि नाकापार्डी वर्तुळातील वन कर्मचा-यावर कारवाई न झाल्यास, आणि सोळा महीन्याची मजुरी न दिल्यास,अत्यंत गंभीर असलेल्या आजारी मुलीसह वनमंञ्यांच्या घरासमोर प्राणत्याग आंदोलन करण्याचा ईशारा हिवरी वनपरीक्षेञातील कक्ष क्र.२७६ सालोडचे रोजंदारी वन मजुर चिंतामण नारायण येसनसुरे यांनी दिला आहे. घाटाना (लोणी)च्या एका बाल मजुराच्या नावे सहा महीन्याचा पगार आणि पुण्याच्या अमोलची मजुरीची हजारो रुपयांची रक्कम अकोला बाजार च्या स्टेट बँकेत जमा केली आहे हे विशेष.