Home विदर्भ राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकाची आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथकाची आढावा बैठक संपन्न

44
0

अमरावती – मा.सहायक संचालक डॉ.भंडारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.05/11/2020 रोजी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती आयोजित अंडवृद्धी शस्त्रक्रिया पूर्वतयारी व आढावा बैठकीत अंडवृद्धी रुग्ण तसेच हत्तीरुग्ण यांच्या यादीबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीला मार्गदर्शन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर व जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांनी केले यावेळी अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी अकोला श्री.मुंद्रे सर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री.प्रविण चकुले,तांत्रिक विभागप्रमुख श्री.प्रकाश दातीर उपस्थित होते या बैठकीत अंडवृद्धी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व हत्तीरुग्णांना व्यवस्थित औषधोपचार देण्यात यावे अशी सूचना जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांनी केली यावेळी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अंतर्गत 13 उपपथकातील आरोग्य सहायक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.