Home बुलडाणा
53
0

▪ आईच्या पाठोपाठ  मुलानेही सोडले प्राण ,

-अमीन शाह

बुलडाणा : जगण्या मरण्याचे शाश्वत सत्य कुणीच नाकारू शकत नाही. मृत्यू अटळ आहे. परंतु जन्मदात्री आईपाठोपाठ मूलानेही प्राण त्यागल्याची दुदैवी घटना येथील मलकापूररोडवरील बजाज शोरुम जवळ आज सकाळी ११ वाजता समोर आली.

५५ वर्षीय मृतक रमेश पवार यांच्या आईचे काल २ नोव्हेंबर रोजी वृध्दपकाळाने निधन झाले.
आईच्या छत्रछायेखाली लहानाचे मोठे झालेले रमेश पवार हलाखीच्या परिस्थितीमूळे गेल्या काही दिवसापासून अत्यवस्थ होते. अशात त्यांच्या आईच्या निधनाचे दुःख सहन होवू शकले नाही.काल रमेश यांनी विधिवत आईच्या मृतदेहावर वरवंड येथे अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडले. आणि आज ३ नोव्हेंबर रोजी वरवंड येथून बुलडाण्याला परतले.आईच्या जाण्याने त्यांनी  मलकापूर रोडवरच बसल्यास्थितीत आपले प्राण सोडले. या प्रकरणी शहर पोलिसांनी पंचनामा करुन मर्ग दाखल केला आहे.पूढील तपास एएसआय अप्पाराव गवई, पोकॉ प्रशांत मोरे करीत आहे.आईपाठोपाठ मुलाच्या निधनामूळे वरवंड गावात शोककळा पसरली आहे.