Home बुलडाणा देऊळगाव माळी येथे क्रांतीसुर्य तालीम संघाच्या वतीने मोफत कबड्डी प्रशिक्षणाचे थाटात उद्घाटन

देऊळगाव माळी येथे क्रांतीसुर्य तालीम संघाच्या वतीने मोफत कबड्डी प्रशिक्षणाचे थाटात उद्घाटन

47
0

 कैलास राऊत

स्थानिक पहिलवान क्रांतीसुर्य तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष किसनराव बळी साहेब यांच्या संकल्पनेतून गावातील तरुणांना खेळाप्रती आपली असलेली कलाकौशल्य जोपासताना त्यांना मैदान उपलब्ध व्हावे म्हणून मागील पंचवीस वर्षापासून क्रांतीसुर्य तालीम संघ यासाठी अहोरात्र कार्य करत आहे.

गावातील तरुणांसाठी देऊळगाव माळी गावातील शिक्षक अरुण बळी सर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देऊळगाव माळी येथील वय वर्षे 12 ते 20 या गटातील युवकांना कबड्डी प्रशिक्षणाचे धडे देण्यासाठी क्रांतीसुर्य तालीम संघाच्या क्रीडा मैदानावर भारतीय देशी खेळ म्हणून राज्यस्तरीय कबड्डीपटू तसेच पी.के.व्ही.विद्यापीठाचा कलर होल्डर पंकज तानाजी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीसुर्य क्रीडा मंडळाच्या वतीने युवकांसाठी कबड्डी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले त्याचे उद्घाटन नुकतेच देऊळगाव माळी मध्ये पार पडले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर तथा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे संदीप भाऊ गिर्हे पुणे यांच्या शुभहस्ते या कबड्डी प्रशिक्षणाचे उद्घाटन पार पडले या कार्यक्रमा प्रसंगी क्रांतीसुर्य तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष किसनराव बळी साहेब तर प्रमुख अतिथी म्हणून बी .के . सुरुशे ,पैलवान दत्ता तायडे ,पहिलवान अशोक मगर ,विष्णू भराड सर ,हरिभाऊ मगर , गिर्हे, मगर ,लोणकर, रवी पाटिल,देवानंद बळी, प्रशिक्षक पंकज लोणकर, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला प्रशिक्षक पंकज लोणकर यांच्यासह कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कबड्डी प्रशिक्षणाचे नारळ फोडून मैदानावर रीतसर उद्घाटन करण्यात आले कबड्डी प्रशिक्षण कोच पंकज लोणकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीसुर्य तालीम संघाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान किसनराव बळी यांनी केले त्यानंतर प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन पत्रकार कैलास राऊत यांनी केलेले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीसुर्य तालीम संघाच्या सर्व पहिलवानी परिश्रम घेत, या ठिकाणी मोफत कबड्डी प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याबद्दल उपस्थित खेळाडूंनी क्रांतीसुर्य तालीम संघाचे आभार मानले.