Home नांदेड प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू ठेकेदारांचे परप्रांतीय मजुरांकडून दिवसाढवळ्या अवैध रेती उत्खनन

प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू ठेकेदारांचे परप्रांतीय मजुरांकडून दिवसाढवळ्या अवैध रेती उत्खनन

125
0

शशिकांत गाडे

नांदेड – लोहा तालुक्यातील अनेक भागातून खुले आम अवैध रेतीची वाहतूक होत असून रविवारी प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अवैध रेतीचे उत्खनन वाळू ठेकेदारांनी करीत प्रशासनाला दिवसाढवळ्या जणू चॅलेंजचे केले असल्याचे दिसून येत आहे.
सोंनखेड सर्कल मध्ये दिवसाढवळ्या बिना नंबर प्लेट असलेल्या वाहनातून रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे.
शेवडी बाजीराव ,बेटसांगवी,पेनूर, जवळा यासह जवळील परिसरातून नदीपात्रातून चोरट्या मार्गाने अनेक राज्यातील परप्राञीय मजूर लावून रेतीचे अवैध उत्खनन केले जात आहे.सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संरक्षण समिती जिल्हा सचिव शशीकांत गाडे पाटिल यांनी नदीवर जाऊन स्टिंग आॕपरेशन केले व संबंधित प्रशासनास निरदर्शनास आणून देखील प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही.यामुळे प्रशासनाचे लाखोंचे महसूल बुडत आहे.

परप्रांतीय मजुरांची चौकशी करावी

अवैध रेती उत्खनन करण्यासाठी परप्रांतीय मजुरांना बोलविण्यात आले असल्याने त्यांची चौकशी करून त्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड तपासण्यात यावे अशी मागणी परीसरातील गावकऱ्यांनी केली आहे.

मुदखेड अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये

मुदखेड तालुक्यातील अवैध रेतीचे टिप्पर पलटी होऊन दोन मजुरांना आपले पाय गमवावे लागले असून अनेक मजूर गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना ताजी असतानाच लोहा तालुक्यातील परिसरातील बिनानंबरचे टॅक्टर, टिप्पर, हायवा अवैध रेतीचे उत्खनन करीत आहेत.त्यामुळे मुदखेड येथील घटनेची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.